ईपीएफओ सदस्यसंख्येत 19 टक्के वाढ
नवी दिल्ली :
आर्थिक वर्ष 2024 मध्ये ईपीएफओ सदस्य संख्या 19 टक्के इतकी वाढली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. श्रम मंत्रालयाने या संदर्भातील माहिती दिली आहे.
कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात ईपीएफओ सदस्य संख्येमध्ये मागच्या आर्थिक वर्षांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जवळपास 1 कोटी 65 लाख नवे सदस्य ईपीएफओमध्ये सामील झाले आहेत. 2023-24 आर्थिक वर्षात ईपीएफओ सदस्य संख्येमध्ये 19 टक्के इतकी वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या साडेसहा वर्षांमध्ये पाहता 6.1 कोटी इतके नवे सदस्य इपीएफओमध्ये सामील झाले आहेत. संख्येत वाढ होणे म्हणजे देशामध्ये रोजगाराची स्थिती सुधारणे असे संकेत मानले जातात.
वर्षानुसार सदस्यसंख्या
ईपीएफओने 2018-19 मध्ये 61.12 लाख सदस्य जोडले होते तर 2019-20 मध्ये 78.58 लाख सदस्य जोडले गेले. मात्र 2020-21 मध्ये सदस्य संख्या घटलेली पहायला मिळाली, यावर्षी 77.08 लाख सदस्य इपीएफओमध्ये सामील झाले होते. कारण त्यावर्षी संपूर्ण देशभरामध्ये कोरोनाने थैमान घातला होता. देशभरात लॉकडाऊनसह विविध प्रतिबंध लावण्यात आले होते.
Home महत्वाची बातमी ईपीएफओ सदस्यसंख्येत 19 टक्के वाढ
ईपीएफओ सदस्यसंख्येत 19 टक्के वाढ
नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2024 मध्ये ईपीएफओ सदस्य संख्या 19 टक्के इतकी वाढली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. श्रम मंत्रालयाने या संदर्भातील माहिती दिली आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात ईपीएफओ सदस्य संख्येमध्ये मागच्या आर्थिक वर्षांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जवळपास 1 कोटी 65 लाख नवे सदस्य ईपीएफओमध्ये सामील झाले आहेत. 2023-24 आर्थिक वर्षात […]