कॅम्प परिसरातील 18 मोकाट जनावरे पकडली
बेळगाव : महानगरपालिकेकडून मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. कॅम्प परिसरात फिरणारी मोकाट जनावरे मंगळवारी पकडली आहेत. त्या जनावरांना पकडून श्रीनगर येथील गो-शाळेमध्ये दाखल करण्यात आली आहेत. जनतेतून तक्रारी वाढल्याने ही मोहीम राबविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. कॅम्प परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे फिरत होती. त्यामुळे मंगळवारी त्यांना पकडण्यात आले. एकूण 18 मोकाट जनावरांना पकडण्यात आले आहे. त्या सर्वांना गो-शाळेत पाठविण्यात आले आहे. जनावरांचे मालक काही जण जाणूनबुजून त्यांना मोकाटपणे फिरण्यास सोडत आहेत. मात्र ही जनावरे नुकसान करत असल्यामुळे अनेकांनी त्याबाबत तक्रारी केल्या होत्या. उद्यान तसेच इतर ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेमधील झाडे तसेच इतर साहित्यांचेही या जनावरांनी नुकसान केले होते. त्यामुळे मंगळवारी या परिसरातील मोकाट जनावरे पकडण्यात आल्याचे राजू संकन्नावर यांनी सांगितले.
Home महत्वाची बातमी कॅम्प परिसरातील 18 मोकाट जनावरे पकडली
कॅम्प परिसरातील 18 मोकाट जनावरे पकडली
बेळगाव : महानगरपालिकेकडून मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. कॅम्प परिसरात फिरणारी मोकाट जनावरे मंगळवारी पकडली आहेत. त्या जनावरांना पकडून श्रीनगर येथील गो-शाळेमध्ये दाखल करण्यात आली आहेत. जनतेतून तक्रारी वाढल्याने ही मोहीम राबविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. कॅम्प परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे फिरत होती. त्यामुळे मंगळवारी त्यांना पकडण्यात आले. एकूण 18 मोकाट […]