पालघरात इयरफोन लावून रुळ ओलांडताना रेल्वेची धड़क लागून 16 वर्षीय मुलीचा मृत्यु

इयरफोन लावून वाहन चालवणे धोकादायक आहे. तसेच चालताना देखील इयरफोन लावून चालणे हे धोकादायक असू शकते. अनेकदा या मुळे अपघात घडतात. रेलवे रूळ ओलांडू नका असे करणे धोकादायक होऊ शकते असे वारंवार रेलवे प्रशासन सूचना देतात तरीही काही जण रेल्वेचे रुळ ओलांडतात. …

पालघरात इयरफोन लावून रुळ ओलांडताना रेल्वेची धड़क लागून 16 वर्षीय मुलीचा मृत्यु

इयरफोन लावून वाहन चालवणे धोकादायक आहे. तसेच चालताना देखील इयरफोन लावून चालणे हे धोकादायक असू शकते. अनेकदा या मुळे अपघात घडतात. रेलवे रूळ ओलांडू नका असे करणे धोकादायक होऊ शकते असे वारंवार रेलवे प्रशासन सूचना देतात तरीही काही जण रेल्वेचे रुळ ओलांडतात. असेच काहीसे घडले आहे पालघर येथे. 

इयरफोन लावून रेल्वेचे रुळ ओलांडताना रेल्वेची धड़क बसून एका 16 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. अशी माहिती शुक्रवारी अधिकाऱ्यांनी दिली. वैष्णवी रावल असे मयत मुलीचे नाव आहे.  

ALSO READ: महाराष्ट्रात सरकारी बसचा प्रवास महागणार, दरात 15 टक्के वाढ
 सदर घटना गुरुवारी दुपारी 1:10 वाजेच्या सुमारास सफाळे आणि केळवे रोड रेल्वे स्थानकादरम्यान घडली. वैष्णवी नावाची मुलगी रेल्वेचे रुळ ओलांडत होती. तिने इयरफोन लावले होते. तिला जवळ येणाऱ्या कोचुवेली-अमृतसर सुपरफास्ट एक्सप्रेसची धड़क बसली आणि तिला गंभीर दुखापत झाली. 

तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. तिच्या मृत्युने कुटुंबात खळबळ उडाली आहे.पोलिसांनी तिच्या मृत्यूची अपघाती मृत्यु म्हणुन नोंद केली आहे. प्रकरणाचा तपास सुरु आहे. 

Edited By – Priya Dixit 

 

 

Go to Source