लोकसभेसाठी गोव्यात 16 उमेदवार रिंगणात
भाजप, काँग्रेसबरोबर अपक्षांचा भरणा : मात्र थेट लढती काँग्रेस व भाजपातच
पणजी : उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रिंगणात आता एकूण 8 अंतिम उमेदवार राहिले असून त्यात 3 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे तर 5 जण पक्षाचे उमेदवार आहेत. तुकाराम उर्फ मनोज परब हे रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे उमेदवार असून त्यांचे निवडणूक चिन्ह फुटबॉल आहे. मिलन वायंगणकर या बहुजन समाज पक्षाच्या उमेदवार असून त्यांचे चिन्ह हत्ती आहे. रमाकांत खलप हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे उमेदवार असून त्यांचे चिन्ह हात आहे. श्रीपाद नाईक हे भाजपचे उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. सखाराम नाईक हे अखिल भारतीय परिवार पार्टीचे उमेदवार असून त्यांना किटली हे चिन्ह मिळाले आहे. थॉमस आगुस्तिन फर्नांडिस हे अपक्ष उमेदवार असून त्यांचे चिन्ह अन्नाची थाळी आहे. अॅड. विशाल नाईक हे देखील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असून त्यांचे चिन्ह गॅस सिलिंडर आहे. शकील जमाल शेख हे अपक्ष उमेदवार हेल्मेट चिन्ह घेऊन निवडणूक रिंगणात आहेत.
दक्षिण गोव्यात 8 उमेदवार
दक्षिण गोवा मतदारसंघात एकूण 8 उमेदवार अंतिम रिंगणात राहिले आहेत. त्यात 5 पक्षीय तर 3 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. पल्लवी धेंपे या भाजपच्या उमेदवार असून त्यांचे चिन्ह कमळ आहे, तर ऊबर्ट परेरा हे आरजीपीचे उमेदवार फुटबॉल चिन्हावर रिंगणात आहेत. विरियातो फर्नांडिस हे काँग्रेसचे उमेदवार असून हात निशाणी आहे. बहुजन समाज पक्षातर्फे डॉ. श्वेता गांवकर या हत्ती चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. हरिश्चंद्र नाईक हे करप्शन एबोलिशन पार्टीचे उमेदवार असून त्यांचे चिन्ह फुटबॉल खेळाडू आहे. त्याशिवाय अॅलेक्सी फर्नांडिस या अपक्ष उमेदवार रिंगणात असून त्यांना फणस हे चिन्ह देण्यात आले आहे. डॉ. कालिदास वायंगणकर हे अपक्ष उमेदवार असून त्यांचे चिन्ह जहाज आहे तर दीपकुमार मापारी या अपक्ष उमेदवाराचे चिन्ह सीसीटिव्ही पॅमेरा आहे. दक्षिण गोव्यात एकूण 8 उमेदवार एकमेकांशी लढणार असून त्यांची यादी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तथा निर्वाचन अधिकारी अश्विन चंद्रू यांनी जाहीर केली आहे. दक्षिण गोव्यात एकूण 3 महिला उमेदवार रिंगणात आहेत. भाजप, काँग्रेस व आरजीपी या तिन्ही पक्षात आणि त्यांच्या उमेदवारात खरी लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. एकूण उमेदवार 16 असले तरी लढत मात्र तिरंगी आहे. उत्तर – दक्षिण गोव्यात अनुक्रमे 8 व 8 असे मिळून एकूण 16 उमेदवार रिंगणात आहेत.
Home महत्वाची बातमी लोकसभेसाठी गोव्यात 16 उमेदवार रिंगणात
लोकसभेसाठी गोव्यात 16 उमेदवार रिंगणात
भाजप, काँग्रेसबरोबर अपक्षांचा भरणा : मात्र थेट लढती काँग्रेस व भाजपातच पणजी : उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रिंगणात आता एकूण 8 अंतिम उमेदवार राहिले असून त्यात 3 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे तर 5 जण पक्षाचे उमेदवार आहेत. तुकाराम उर्फ मनोज परब हे रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे उमेदवार असून त्यांचे निवडणूक चिन्ह फुटबॉल आहे. मिलन वायंगणकर […]
