इथोपियामध्ये 157 बळी
वृत्तसंस्था/ अदिस अबाबा
इथोपियामधील दुर्गम भागामध्ये मुसळधार पाऊस सुरु असून त्यामुळे झालेल्या भुस्खलनामध्ये 157 जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी याबाबत दुजोरा दिला असून दक्षिण इथोपियामधील कैन्चो शाचा गोजदी जिल्ह्यात ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध यांना प्राण गमवावे लागल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. गोफा झोनच्या संपर्क कार्यालयाचे प्रमुख कासाहून अबेनेह यांनी सांगितले, 22 व 23 रोजी झालेल्या मुसळधार पावसाने ही दुर्घटना घडली. या परिसरात शोध मोहिम सुरु असून आतापर्यंत 157 जण मृत्युमुखी पडले आहेत. या ठिकाणाहून 5 जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. अनेकजण अद्यापही बेपत्ता असून मृतांचा आकडा वाढू शकतो. याआधी 2016 मध्येही अशाच प्रकारे येथे अतिवृष्टीनंतर पूर व भूस्खलनाच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळीही मनुष्यहानी झाल्याचे त्यांनी सांगितले.
Home महत्वाची बातमी इथोपियामध्ये 157 बळी
इथोपियामध्ये 157 बळी
वृत्तसंस्था/ अदिस अबाबा इथोपियामधील दुर्गम भागामध्ये मुसळधार पाऊस सुरु असून त्यामुळे झालेल्या भुस्खलनामध्ये 157 जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी याबाबत दुजोरा दिला असून दक्षिण इथोपियामधील कैन्चो शाचा गोजदी जिल्ह्यात ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध यांना प्राण गमवावे लागल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. गोफा झोनच्या संपर्क कार्यालयाचे प्रमुख कासाहून अबेनेह […]