इन्स्टाग्रामवर प्रेमात पडून 15 वर्षीय तरुणी नेपाळहून मुंबईत आली, प्रियकराने तिच्यावर बलात्कार करून सोडून दिले

सोशल मीडियावरील संभाषण आणि नंतर प्रेमामुळे मुले-मुली आपले घर आणि अगदी देश सोडून देखील जात असल्याचे प्रकरण बघण्यात येत असतात. अशा प्रेमप्रकरणांच्या अनेक प्रकरणांमध्ये फसवणूकही पाहायला मिळते. मुंबईतही असाच एक प्रकार उघडकीस आला असून, सोशल मीडियावर …

इन्स्टाग्रामवर प्रेमात पडून 15 वर्षीय तरुणी नेपाळहून मुंबईत आली, प्रियकराने तिच्यावर बलात्कार करून सोडून दिले

सोशल मीडियावरील संभाषण आणि नंतर प्रेमामुळे मुले-मुली आपले घर आणि अगदी देश सोडून देखील जात असल्याचे प्रकरण बघण्यात येत असतात. अशा प्रेमप्रकरणांच्या अनेक प्रकरणांमध्ये फसवणूकही पाहायला मिळते. मुंबईतही असाच एक प्रकार उघडकीस आला असून, सोशल मीडियावर प्रेमाचे नाटक करून एका तरुणीची फसवणूक करण्यात आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार अलीकडेच नेपाळमधील एक अल्पवयीन मुलगी तिच्या इंस्टाग्राम मित्राला भेटण्यासाठी सीमा ओलांडून भारतात आली होती. आभासी दुनियेतील तिचा मित्र आयुष्यभर सोबत राहण्याची शपथ घेईल, असे मुलीला वाटले होते, पण घडले उलटेच. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर या मुलाने तिला अनोळखी शहरात निराधार सोडले.

 

असे सांगितले जात आहे की नेपाळमधील 15 वर्षांच्या मुलीची मुंबईजवळील मुंब्रा भागात राहणाऱ्या एका मुलाशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. दोघांनी आधी चॅटिंग सुरू केले आणि नंतर मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली. चर्चा हळूहळू प्रेमापर्यंत पोहोचली. दरम्यान आरोपी मुलाला (बॉयफ्रेंड) भेटण्यासाठी अल्पवयीन मुलगी नेपाळहून मुंबईत आली.

 

खरं तर मुलीला लग्न करून आयुष्यभर प्रियकरासोबत घालवायचं होतं, पण मुलाच्या मनात वेगळंच काही सुरू होतं. त्याला फक्त मुलीशी शारीरिक संबंध ठेवायचे होते. त्याचा हेतू साध्य झाल्यावर त्याने परदेशातून आलेल्या मुलीपासून स्वतःला दूर केले आणि तिला निराधार सोडले. यामुळे मुलीला धक्काच बसला. अनोळखी शहरात आता काय करावे हे तिला कळत नव्हते.

 

दरम्यान बलात्कार पीडित तरुणी मुंबई लोकल ट्रेनने तिच्या अनोळखी प्रवासाला निघाली. मध्य रेल्वेच्या दादर लोकलमध्ये ती चढली. यावेळी मुलीची अवस्था पाहून सहप्रवाशांना काहीतरी अनुचित प्रकार झाल्याचा संशय आला. त्यातील काहींनी मुलीला तिच्या अवस्थेचे कारण विचारले. तेव्हाच ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

 

यानंतर प्रवाशांनी नेपाळहून आलेल्या मुलीला दादर स्थानकात पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला आणि प्राथमिक तपासानंतर काही तासांतच आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Go to Source