स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रातील 15 सरपंच उपस्थित राहणार
15 ऑगस्ट रोजी राजधानी दिल्लीतील (delhi) लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या (independent day) समारंभासाठी देशभरातील 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 210 ग्रामपंचायत सरपंचांना (sarpanch) विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील (maharashtra) एकूण 15 सरपंचांचा समावेश आहे, ज्यात नऊ महिला सरपंचांचा समावेश आहे. या सर्व सरपंचांचा केंद्र सरकारच्या पंचायती राज विभागाकडून विशेष सन्मान केला जाईल.सन्मानित होणाऱ्या सरपंचांनी त्यांच्या गावांमध्ये पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि समावेशक उपक्रमांमध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणल्या आहेत. त्यांनी ‘हर घर जल’, ‘प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण’, ‘मिशन इंद्रधनुष’ यासारख्या केंद्र सरकारच्या योजना 100 टक्के प्रभावीपणे राबवल्या आहेत. तसेच स्थानिक गरजांनुसार नवीन उपक्रम देखील राबवले आहेत.महाराष्ट्रातून निवडून आलेले ग्रामपंचायत सरपंचप्रमोद नरहरी लोंढे (लोंढेवाडी, ता. माढा, जि. सोलापूर)जयश्री धनंजय इंगोले (खसला नाका, ता. कामठी, जि. नागपूर)संदीप पांडुरंग ढेरंगे (कोरेगाव भीमा, ता. शिरूर, जि. पुणे)डॉ.अनुप्रिता सचिन भांडे (महतोडी, ता. अकोला, जि. अकोला)नयना अशोक भुसारे (भावसे, ता. शहापूर, जि. ठाणे),सुनीता दत्तात्रेय मिटकरी (ढोरखेडा, ता. मालेगाव, जि. वाशीम),अपर्णा नितीन राऊत (कोंढाळा, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली),संजीवनी वैजनाथ पाटील (खर्डा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर),चंद्रकुमार काशीराम बहेकर (भेजपार, ता. सालेकसा, जि. गोंदिया),रोमिला रामेश्वर बिसेन (केसलवधा/पवार, ता. लाखनी, जि. भंडारा),सूरज संतोष चव्हाण (चिंचाळी, ता. दापोली, जि. रत्नागिरी),पार्वती शेषराव हरकळ (कुंभारी, ता. जिंतूर, जि. परभणी),प्रमोद किसन जगदाळे (बिदळ, ता. माण, जि. सातारा),शशिकांत माधवराव मांगले (कसबेगव्हाण, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती),प्रभावती राजकुमार बिराजदार (बामणी, ता. उदगीर, जि. लातूर)विशेष अतिथींचे औपचारिक स्वागत14 ऑगस्ट रोजी म्हणजेच गुरुवारी या विशेष पाहुण्यांचे औपचारिक स्वागत करण्यात येणार असून केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंह, केंद्रीय राज्यमंत्री प्रा.एस.पी.सिंग बघेल आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. “स्वावलंबित पंचायत, विकसित भारताची ओळख” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ‘सभा सार’ अॅपचे लाँचिंग आणि ‘ग्रामोदय संकल्प’ मासिकाच्या 16 व्या अंकाचे प्रकाशन होईल.हेही वाचा14 वर्षांखालील गोविंदांच्या सहभागावर बंदीमुंबई-गोवा महामार्गावर 23 ऑगस्टपासून जड वाहनांना बंदी
Home महत्वाची बातमी स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रातील 15 सरपंच उपस्थित राहणार
स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रातील 15 सरपंच उपस्थित राहणार
15 ऑगस्ट रोजी राजधानी दिल्लीतील (delhi) लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या (independent day) समारंभासाठी देशभरातील 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 210 ग्रामपंचायत सरपंचांना (sarpanch) विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
यामध्ये महाराष्ट्रातील (maharashtra) एकूण 15 सरपंचांचा समावेश आहे, ज्यात नऊ महिला सरपंचांचा समावेश आहे. या सर्व सरपंचांचा केंद्र सरकारच्या पंचायती राज विभागाकडून विशेष सन्मान केला जाईल.
सन्मानित होणाऱ्या सरपंचांनी त्यांच्या गावांमध्ये पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि समावेशक उपक्रमांमध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणल्या आहेत. त्यांनी ‘हर घर जल’, ‘प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण’, ‘मिशन इंद्रधनुष’ यासारख्या केंद्र सरकारच्या योजना 100 टक्के प्रभावीपणे राबवल्या आहेत. तसेच स्थानिक गरजांनुसार नवीन उपक्रम देखील राबवले आहेत.
महाराष्ट्रातून निवडून आलेले ग्रामपंचायत सरपंच
प्रमोद नरहरी लोंढे (लोंढेवाडी, ता. माढा, जि. सोलापूर)
जयश्री धनंजय इंगोले (खसला नाका, ता. कामठी, जि. नागपूर)
संदीप पांडुरंग ढेरंगे (कोरेगाव भीमा, ता. शिरूर, जि. पुणे)
डॉ.अनुप्रिता सचिन भांडे (महतोडी, ता. अकोला, जि. अकोला)
नयना अशोक भुसारे (भावसे, ता. शहापूर, जि. ठाणे),
सुनीता दत्तात्रेय मिटकरी (ढोरखेडा, ता. मालेगाव, जि. वाशीम),
अपर्णा नितीन राऊत (कोंढाळा, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली),
संजीवनी वैजनाथ पाटील (खर्डा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर),
चंद्रकुमार काशीराम बहेकर (भेजपार, ता. सालेकसा, जि. गोंदिया),
रोमिला रामेश्वर बिसेन (केसलवधा/पवार, ता. लाखनी, जि. भंडारा),
सूरज संतोष चव्हाण (चिंचाळी, ता. दापोली, जि. रत्नागिरी),
पार्वती शेषराव हरकळ (कुंभारी, ता. जिंतूर, जि. परभणी),
प्रमोद किसन जगदाळे (बिदळ, ता. माण, जि. सातारा),
शशिकांत माधवराव मांगले (कसबेगव्हाण, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती),
प्रभावती राजकुमार बिराजदार (बामणी, ता. उदगीर, जि. लातूर)विशेष अतिथींचे औपचारिक स्वागत
14 ऑगस्ट रोजी म्हणजेच गुरुवारी या विशेष पाहुण्यांचे औपचारिक स्वागत करण्यात येणार असून केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंह, केंद्रीय राज्यमंत्री प्रा.एस.पी.सिंग बघेल आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
“स्वावलंबित पंचायत, विकसित भारताची ओळख” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ‘सभा सार’ अॅपचे लाँचिंग आणि ‘ग्रामोदय संकल्प’ मासिकाच्या 16 व्या अंकाचे प्रकाशन होईल.हेही वाचा
14 वर्षांखालील गोविंदांच्या सहभागावर बंदी
मुंबई-गोवा महामार्गावर 23 ऑगस्टपासून जड वाहनांना बंदी