कोगे १५ एकरांतील ऊस जळून खाक ; हातचं पीक गेल्यांने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान
कसबा बीड / वार्ताहर
कोगे ता. करवीर येथील जोशी राय ( घमेवाडी ) परिसरातील १५ एकर ऊस जळून खाक झाला असून यामध्ये १० ते १२ शेतकऱ्यांचे २० लाखा पर्यंत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. नुकतीच बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. आगीचे कारण समजू शकले नाही. हाती आलेलं पीक अपघाताने गमवावे लागल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत. अचानक आग लागल्याने बघता बघता १५ एकर क्षेत्र जळून खाक झाले. यामध्ये सर्जेराव पाटील, राजाराम पाटील, संतोष पाटील, लक्ष्मण पाटील, प्रल्हाद पाटील, बळवंत मिठारी, आकाराम मिठारी, बाबासो मिठारी, संभाजी मिठारी, आनंदा मिठारी, गोविंद मिठारी, चंद्रकांत मिठारी ,प्रल्हाद पाटील सर्जेराव पाटील ,दत्तू लखू मिठारी ,शिवाजी मिठारी,आकराम पाडूरंग मिठारी,बाबासो सदाशिव मिठारी ,पाडू खडके आदी शेतक ऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन, ऊसात भांगे पाडल्यामुळे अनेकांचा ऊस आगीपासून वाचला. जळालेला ऊस कारखान्यांने लवकरात लवकर घेऊन जाण्यासाठी तोडणी यंत्रणा देऊन सहकार्य करावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
Home महत्वाची बातमी कोगे १५ एकरांतील ऊस जळून खाक ; हातचं पीक गेल्यांने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान
कोगे १५ एकरांतील ऊस जळून खाक ; हातचं पीक गेल्यांने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान
कसबा बीड / वार्ताहर कोगे ता. करवीर येथील जोशी राय ( घमेवाडी ) परिसरातील १५ एकर ऊस जळून खाक झाला असून यामध्ये १० ते १२ शेतकऱ्यांचे २० लाखा पर्यंत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. नुकतीच बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. आगीचे कारण समजू शकले नाही. हाती आलेलं पीक अपघाताने गमवावे लागल्यानं शेतकरी […]