राज्यात आढळले 1,436 बोगस डॉक्टर

स्त्री भ्रूण हत्येचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोग्य खाते खडबडून जागे : दोन हजार बनावट रुग्णालयांनाही टाळे वार्ताहर /बेंगळूर राज्यात स्त्राr भ्रूण हत्येचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य खात्याने आता बनावट डॉक्टर शोधण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार राज्यात 35,123 डॉक्टरांनी अधिकृत नोंदणी केली असून 1,436 बोगस डॉक्टर असल्याचे आढळून आले आहेत. दरम्यान, आढळून […]

राज्यात आढळले 1,436 बोगस डॉक्टर

स्त्री भ्रूण हत्येचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोग्य खाते खडबडून जागे : दोन हजार बनावट रुग्णालयांनाही टाळे
वार्ताहर /बेंगळूर
राज्यात स्त्राr भ्रूण हत्येचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य खात्याने आता बनावट डॉक्टर शोधण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार राज्यात 35,123 डॉक्टरांनी अधिकृत नोंदणी केली असून 1,436 बोगस डॉक्टर असल्याचे आढळून आले आहेत. दरम्यान, आढळून आलेल्या दोन हजारांहून अधिक बनावट रुग्णालयांना खात्याने टाळे ठोकले आहे. आपण डॉक्टरांना देवाचे स्थान देतो. पण सगळे डॉक्टर देव नसतात, बोगसही असतात. आरोग्य खात्याने आता राज्यात दीड हजारांहून अधिक बोगस डॉक्टरांचा शोध लावला आहे. खात्याने एक पाऊल पुढे टाकत राज्यातील सर्व डॉक्टरांची प्रमाणपत्रे तपासली. नुकतेच राज्यात खळबळ माजवलेल्या स्त्राr भ्रूण हत्येच्या प्रकरणात अनेकजण सहभागी झाले होते. तात्काळ आढळून आलेल्या बोगस बनावट डॉक्टरांची संख्या 1,436 आहे. या संदर्भात दोन हजारांहून अधिक बनावट दवाखाने आणि प्रयोगशाळांनाही टाळे ठोकण्यात आले आहे.
कोणते डॉक्टर असली आणि कोणते नकली?
जे पांढरे कपडे घालतात आणि स्टेथोस्कोप ठेवतात त्यांना डॉक्टर म्हणता येणार नाही. कर्नाटक मेडिकल कौन्सिल किंवा कर्नाटक प्रायव्हेट मेडिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट अंतर्गत नोंदणीकृत असावेत किंवा आयुषच्या बाबतीत डॉक्टर आयुष बोर्ड किंवा कर्नाटक आयुर्वेद युनानी प्रॅक्टिशनर्स असोसिएशनमध्ये नोंदणीकृत असावेत. याच्याशिवाय जे वैद्यकीय व्यवसाय करतात ते बोगस आहेत.
बनावट डॉक्टर सापडल्यास कडक शिक्षेची तरतूद
बनावट डॉक्टर आढळून आल्यास पहिल्यांदा 25,000 रुपये दंड, दुसऱ्यांदा 2.5 लाख रुपये दंड आणि 1 वर्ष तुरुंगवास आणि तिसऱ्यांदा पकडल्यास 5 लाख रुपये दंड आणि 3 वर्षांचा तुरुंगवास अशा कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
बेळगावमध्ये 170 बोगस डॉक्टर
बिदरमध्ये सर्वाधिक 423 बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. याचबरोबर कोलारमध्ये 179, बेळगावमध्ये 170, कलबुर्गीमध्ये 82, शिमोगामध्ये 74, धारवाडमध्ये 70, बेंगळूर शहरात 67 बोगस डॉक्टर सापडले आहेत. मंगळूरमध्ये 19 तर उडुपीमध्ये 2 बनावट डॉक्टर आढळले आहेत.
कठोर कारवाईस तयार
आरोग्य खाते बनावट डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यास तयार आहे. आता एका संघाच्या रुपात आरोग्य खाते कार्यरत असून यापुढे नियमित कठोर कारवाई केली जाईल.
 -रणदीप डी.,आरोग्य खात्याचे आयुक्त

Go to Source