सोनियांसह 14 जणांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ

वृत्तसंस्था /नवी दिल्ली काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह 14 जणांनी गुऊवारी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी त्यांना नवीन संसद भवनात शपथ दिली. सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून वरिष्ठ सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेतली, तर वैष्णव यांनी ओडिशातून राज्यसभेवर निवडून आले आहेत. राज्यसभेची शपथ घेणाऱ्या […]

सोनियांसह 14 जणांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ

वृत्तसंस्था /नवी दिल्ली
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह 14 जणांनी गुऊवारी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी त्यांना नवीन संसद भवनात शपथ दिली. सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून वरिष्ठ सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेतली, तर वैष्णव यांनी ओडिशातून राज्यसभेवर निवडून आले आहेत. राज्यसभेची शपथ घेणाऱ्या 14 जणांमध्ये काँग्रेस नेते अजय माकन आणि कर्नाटकातील सय्यद नसीर हुसेन, उत्तर प्रदेशचे भाजप नेते आरपीएन सिंह आणि पश्चिम बंगालमधील भाजप सदस्य सामिक भट्टाचार्य यांचा समावेश आहे. बिहारमधून राज्यसभेवर पाठविण्यात आलेले जेडीयुचे संजय कुमार झा, तसेच ओडिशातील बीजेडीच्या सुभाशिष खुंटिया आणि देबाशिष समंतराय यांनीही शपथ घेतली. भाजपचे मदन राठोड यांनी राजस्थानचे प्रतिनिधी म्हणून शपथ घेतली. सोनिया गांधी पहिल्यांदाच राज्यसभेच्या सदस्य झाल्या आहेत. त्यांनी सभागृह नेते पियूष गोयल आणि काँग्रेस अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीवेळी कन्या प्रियांका गांधी-वधेरा देखील उपस्थित होत्या.