हुक्का बारवर टाकलेल्या छाप्यात ‘बिग बॉस’ विजेत्यासह १४ जण पोलिसांच्या ताब्यात

मुंबई पोलिसांच्या एसएस ब्रँच (सोशल सर्विस ब्रँच) ने मंगळवारी रात्री एका हुक्का बारवर छापा टाकला. या छाप्यात बिग बॉस १७चा विजेता, स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारूकी याच्यासह १४ लोकांना ताब्यात घेतलं होतं. रिपोर्टनुसार, पोलिसांनी ४१ A ची नोटिस देऊन …
हुक्का बारवर टाकलेल्या छाप्यात ‘बिग बॉस’ विजेत्यासह १४ जण पोलिसांच्या ताब्यात

मुंबई पोलिसांच्या एसएस ब्रँच (सोशल सर्विस ब्रँच) ने मंगळवारी रात्री एका हुक्का बारवर छापा टाकला. या छाप्यात बिग बॉस १७चा विजेता, स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारूकी याच्यासह  १४ लोकांना ताब्यात घेतलं होतं.

 

रिपोर्टनुसार, पोलिसांनी ४१ A ची नोटिस देऊन फारूकीला सोडले. बिग बॉस ओटीटी २ विजेता एल्विश यादव नंतर बिग बॉस १७ विजेता मुनव्वर फारूकी वादात सापडला आहे. सोशल सर्व्हिस ब्रँचने रात्री मुंबईच्या फोर्ट परिसरात सबालन हुक्का पार्लरमध्ये छाप्यावेळी काही लोकांना ताब्यात घेतलं, यापैकी एक मुनव्वर होता.

 

पोलिसांना माहिती मिळाली होती की, पार्लरमध्ये तंबाकू प्रोडक्ट्ससोबत निकोटिनचा वापर हुक्का पार्लरमध्ये होत होता. सध्या या प्रकरणी पोलिस तपास करत आहे. रिपोर्टनुसार, मुनव्वर फारूकीला नोटिस देऊन रात्री उशीरा घरी जाऊ दिलं. या प्रकरणी मुनव्वर कडून अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलेले नाही.

 

Edited by Ratnadeep Ranshoor

Go to Source