कोगनोळी टोलनाक्यावर 14 लाख जप्त

ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या प्रवाशावर एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई निपाणी : कोगनोळी तपासनाक्यावर एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाकडून 14 लाखांची रोकड जप्त केली आहे. बुधवारी मध्यरात्री 2 वाजता ही कारवाई करण्यात आली. याबाबत ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सदर ट्रॅव्हल्स ही साताऱ्याहून बेंगळूरकडे जात होती. कोगनोळी तपासनाक्यावर गाडी आली असता प्रवाशांची झडती घेण्यात आली. त्यात निसार […]

कोगनोळी टोलनाक्यावर 14 लाख जप्त

ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या प्रवाशावर एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
निपाणी : कोगनोळी तपासनाक्यावर एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाकडून 14 लाखांची रोकड जप्त केली आहे. बुधवारी मध्यरात्री 2 वाजता ही कारवाई करण्यात आली. याबाबत ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सदर ट्रॅव्हल्स ही साताऱ्याहून बेंगळूरकडे जात होती. कोगनोळी तपासनाक्यावर गाडी आली असता प्रवाशांची झडती घेण्यात आली. त्यात निसार सुन्नासादी मूडबाग (ता. होसकोटी, जिल्हा बेंगळूर) या प्रवाशाकडून 14 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. सदर कारवाई एसआयटी कंपनीचे अधिकारी माळाप्पा पद्मना दत्तवाडे, शिवानंद तेली यांनी केली. निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक मनीकंठ पुजारी यांनी या घटनेची नोंद करून घेतली.