बारावीची परीक्षा आजपासून
पणजी : गोव्यात आजपासून बारावीची परीक्षा सुरू होत असून यासाठी 20 केंद्रे सज्ज झाली आहेत. यंदा या परीक्षेसाठी 17 हजार 987 विद्यार्थी बसणार आहेत. यात 8 हजार 550 मुले व 9 हजार 437 मुलींचा समावेश आहे. मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक आहे. गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकाप्रमाणे बारावीची परीक्षा 28 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षा सकाळी 9.30 वाजता सुरू होईल. त्यापूर्वी 45 मिनिटे आधी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, अशी सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. कला शाखेतील 1,379 मुले आणि 2,930 मुली मिळून 4,309, विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. वाणिज्य शाखेत 2 हजार 841 मुले आणि 2 हजार 479 मुली मिळून एकूण 5 हजार 320 विद्यार्थी आहेत. विज्ञान शाखेत 2 हजार 616 मुले आणि 3 हजार 267 मुली मिळून एकूण 5 हजार 883 विद्यार्थी परीक्षा देतील. व्यावसायिक शाखेतून 1 हजार 714 मुले आणि 761 मुली मिळून एकूण 2 हजार 475 विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. गेल्यावर्षी 19 हजार 377 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 18 हजार 479 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. म्हणजे गतवर्षी 95.46 टक्के निकाल लागला होता.
Home महत्वाची बातमी बारावीची परीक्षा आजपासून
बारावीची परीक्षा आजपासून
पणजी : गोव्यात आजपासून बारावीची परीक्षा सुरू होत असून यासाठी 20 केंद्रे सज्ज झाली आहेत. यंदा या परीक्षेसाठी 17 हजार 987 विद्यार्थी बसणार आहेत. यात 8 हजार 550 मुले व 9 हजार 437 मुलींचा समावेश आहे. मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक आहे. गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकाप्रमाणे बारावीची परीक्षा 28 […]