हरमलमधील 125 बांधकामे पाडणार
हरमल पंचायतीने घेतलाय निर्णय : निर्णयाची गोवा खंडपीठाला माहिती
पणजी : हरमल किनारी भागांत असलेल्या गिरकरवाड्यावरील ‘विकास प्रतिबंधित’ क्षेत्रात (एनडीझेड) एकूण बेकायदेशीर 217 बांधकामे आहेत. या 216 पैकी 53 व्यावसयिक बांधकामांना सील ठोकण्यात आले आहेत. 125 बांधकामे मोडण्याचा ठराव हरमल पंचायतीने घेतला असून येत्या 30 दिवसात तीही जमिनदोस्त केली जाणार असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात देण्यात आली आहे. पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे. या अनिर्बंध बांधकामांवर गोवा खंडपीठाच्या दक्षतेनेच पहिली मोठी कारवाई झाली असून आता अन्य किनारे होणार ‘लक्ष्य’ होण्याची शक्यता असल्याने बेकायदेशीर व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. हरमल येथील गिरकरवाडा या केवळ एकाच गिरकरवाड्यावरील ‘विकास प्रतिबंधित’ क्षेत्रात (एनडीझेड) 216 बेकायदेशीर बांधकामे असल्याचे प्रकरण गेले काही महिने गाजत आहे. यातील 66 बांधकामांना व्यवसाय करण्यासाठी परवाना आवश्यक असला तरी त्यातील 13 जणांकडे परवानगी आहे. 53 बांधकामांना व्यवसाय बंद करण्याची नोटीस पाठवून ती सील देखील करण्यात आली असल्याची माहिती गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने खंडपीठात दिली आहे.
एकूण 125 बांधकामे पाडणार
हरमल पंचायतीचे वकील दीपक गावकर यांनी 216 पैकी 125 बांधकामे पाडण्याचा ठराव घेतला असून त्यातील 88 जणांना येत्या 15 दिवसात बांधकामे पाडणार असल्याचे सांगितले. यात काही व्यवसाय चालवणारी 91 बांधकामेही असून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून येत्या 30 दिवसात ती जमिनदोस्त केली जाणार असल्याचे सांगितले. उर्वरित बांधकामाची तपासणी पूर्ण केली असून पुढील 10 दिवसात पंचायतीकडून त्याबाबतीत निर्णय घेतला जाणार आहे. राज्य सरकारतर्फे या बेकायदेशीर बांधकामांचा तपासणी अहवाल तयार केला जाणार असून तो न्ययालयासमोर मांडला जाणार आहे. त्यानंतर, अजूनही न पाडलेल्या उर्वरित बांधकामांबाबत उच्च न्यायालय पुढील सुनावणीला म्हणजे 24 एप्रिल रोजी निर्णय घेणार असल्याचे एजी देविदास पांगम यांनी सांगितले.
व्यावसायिक खंदारी आणि माजी सरपंचला मोठा फटका
किनाऱ्यावर बेकायदेशीर बांधकामांचे हे प्रकरण जेथून सुऊ झाले ते व्यावसायिक खंदारी यांच्या चार मजली इमारत पाडण्याच्या प्रकरणातून. आपणच पाडत असल्याचे आश्वासन त्यांनी गोवा खंडपीठात दिल्यावर त्याला 13 एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. त्यानुसार सोमवारी सुनावणीवेळी खंदारी यांच्या वकिलाने सदर इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याचे सांगितले. फक्त बांधकामाचे टाकाऊ साहित्य आणि ढिगारा हटविण्यात येईल, असे सांगून येत्या 19 तारखेपर्यंत अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले. माजी सरपंच बर्नाड फर्नांडिस याच्या मालकीची 10 बेकायदेशीर बांधकामे असून ती पाडण्यात आली आहेत. याशिवाय, फर्नांडिस याच्या अन्य नातलगांच्या मालकीची 28 बेकायदेशीर बांधकामे अजूनही उभी असल्याचे सांगण्यात आले.
Home महत्वाची बातमी हरमलमधील 125 बांधकामे पाडणार
हरमलमधील 125 बांधकामे पाडणार
हरमल पंचायतीने घेतलाय निर्णय : निर्णयाची गोवा खंडपीठाला माहिती पणजी : हरमल किनारी भागांत असलेल्या गिरकरवाड्यावरील ‘विकास प्रतिबंधित’ क्षेत्रात (एनडीझेड) एकूण बेकायदेशीर 217 बांधकामे आहेत. या 216 पैकी 53 व्यावसयिक बांधकामांना सील ठोकण्यात आले आहेत. 125 बांधकामे मोडण्याचा ठराव हरमल पंचायतीने घेतला असून येत्या 30 दिवसात तीही जमिनदोस्त केली जाणार असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या […]
