कडप्पा शहरामध्ये 11 वर्षीय विद्यार्थ्याला विजेच्या तारेचा धक्का लागल्यामुळे मृत्यू

आंध्रप्रदेश मधील कडप्पा शहरामध्ये बुधवारी दुपारी एका 11 वर्षीय लहान मुलाला विजेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार सायकल विजेच्या मोकळ्या तारांमध्ये अडकली. या घटनेमध्ये सायकलवर मागे बसलेला 10 वर्षीय मुलगा गंभीर …

कडप्पा शहरामध्ये 11 वर्षीय विद्यार्थ्याला विजेच्या तारेचा धक्का लागल्यामुळे मृत्यू

आंध्रप्रदेश मधील कडप्पा शहरामध्ये बुधवारी दुपारी एका 11 वर्षीय लहान मुलाला विजेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार सायकल विजेच्या मोकळ्या तारांमध्ये अडकली. या घटनेमध्ये सायकलवर मागे बसलेला 10 वर्षीय मुलगा गंभीर स्वरूपाने जखमी झालेला आहे. हे दोन्ही विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर घरी जात होते. तेव्हा खांबावर लटकत असलेल्या विजेच्या तारेच्या विळख्यात ते सापडले.

 

धावत येऊन नागरिकांनी तातडीने ते विजेचे तार बाजूला केले. या मध्ये अकरा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला तर दहा  वर्षीय मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांनी वीज महामंडळावर बेजवाबदार पणाचा आरोप लावला आहे. पोलिसांनी केस नोंदवून घेत चौकशी सुरु केली आहे. प्राथमिक चौकशीमधून माहित पडले की, एक डिश टीवीचा तार विजेच्या तारेच्या संपर्कात आला होता. ज्यामुळे हा अपघात घडला आहे. कडप्पाचे आमदार माधवी रेड्डी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांचे सांगितले की सरकार त्यांना सर्व मदत करेल असे आश्वासन दिले.  

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source