जिल्ह्यातील ग्राम पंचायतींच्या 11 लाख मालमत्ता ऑनलाईनवर

जिल्हा पंचायतीकडून संगणकीकृत प्रक्रियेला गती : महसूल वाढीसाठी सरकारचे प्रयत्न बेळगाव : राज्य सरकारकडून ग्राम पंचायतींच्या व्याप्तीत येणाऱ्या मालमत्तांचे सर्वेक्षण संगणकीकृत करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्राम पंचायतींच्या व्याप्तीत येणाऱ्या मालमत्तांचे सर्वेक्षण केले असून जिल्ह्यामध्ये 11 लाख 453 मालमत्ता आहेत. त्यानुसार त्यांचे संगणकीकृत करण्यात येत आहे. पंचतंत्र स्वॉफ्टवेअरवर मालमत्तांची नोंदणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू […]

जिल्ह्यातील ग्राम पंचायतींच्या 11 लाख मालमत्ता ऑनलाईनवर

जिल्हा पंचायतीकडून संगणकीकृत प्रक्रियेला गती : महसूल वाढीसाठी सरकारचे प्रयत्न
बेळगाव : राज्य सरकारकडून ग्राम पंचायतींच्या व्याप्तीत येणाऱ्या मालमत्तांचे सर्वेक्षण संगणकीकृत करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्राम पंचायतींच्या व्याप्तीत येणाऱ्या मालमत्तांचे सर्वेक्षण केले असून जिल्ह्यामध्ये 11 लाख 453 मालमत्ता आहेत. त्यानुसार त्यांचे संगणकीकृत करण्यात येत आहे. पंचतंत्र स्वॉफ्टवेअरवर मालमत्तांची नोंदणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मालमत्ता सर्वेक्षण करून संगणकीकृत करण्यावर राज्य सरकारने भर दिला आहे. मालमत्तांच्या संगणकीकरणामुळे नागरिकांना मालमत्ता कर भरण्यास सोयीचे ठरणार आहे. याबरोबरच खरेदी-विक्री करण्यासाठीही ही प्रक्रिया अधिक सुलभ असणार आहे. त्यामुळे संगणकीकृत मालमत्तांचा उपनोंदणीच्या अखत्यारिनुसार कर ठरविण्यात आला आहे. यासाठी राज्य सरकारने नुकतीच नवीन करप्रणाली जाहीर केली आहे. यामध्ये मालमत्तांच्या करामध्ये वाढ केली आहे. यामुळे नागरिकांना आता सरकारच्या नवीन करप्रणालीनुसार मालमत्तांचा कर भरावा लागणार आहे. सरकारकडून कर वसुलीवर भर दिला जात आहे. त्यामुळे मालमत्तांचे सर्वेक्षण करून पंचतंत्र स्वॉफ्टवेअरवर अपलोड करण्यासाठी सूचना करण्यात आली आहे. यामुळे ग्राम पंचायतीच्या माध्यमातून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल उपलब्ध होणार आहे. तसेच सरकारला ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी करावी लागणारी आर्थिक तरतूद दूर व्हावी, ग्राम पंचायतींचा खर्च महसुलातूनच निघावा या उद्देशाने मालमत्ता संगणकीकृत प्रणालीला भर दिला आहे. जिल्ह्यामध्ये 11 लाख 453 मालमत्ता आहेत, असे जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे संगणकीकृत प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय ग्राम पंचायती व मालमत्ता-

तालुका ग्राम पंचायती संख्या            एकूण मालमत्ता   
बेळगाव  57           1,72,612
खानापूर 51           89780
निपाणी 27           64038
हुक्केरी  52           1,16,102
गोकाक  33           75212
कित्तूर     17           30793
सौंदत्ती   44           89488
कागवाड  8             21905
चिकोडी 36           84350
अथणी    46           116464
रायबाग  38           63351
रामदुर्ग   37           68862
बैलहोंगल  34         67995
मुडलगी 20           39501
एकूण       500      1100453