104 वर्षीय सयदाबी बाबन पटेल यांनी बजावला मतदानाचा हक्क; उमरग्यात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

                                 उमरग्यात 104 वर्षांच्या सयदाबीने दाखवली मतदानाची प्रेरणा धाराशिव उमरगा : नऊ वर्षांनंतर राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान होत असून, उमरगा तालुक्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. उमरगा तालुक्यातील तुरोरी जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या दाबका मतदान केंद्रावर […]

104 वर्षीय सयदाबी बाबन पटेल यांनी बजावला मतदानाचा हक्क; उमरग्यात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

                                 उमरग्यात 104 वर्षांच्या सयदाबीने दाखवली मतदानाची प्रेरणा
धाराशिव उमरगा : नऊ वर्षांनंतर राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान होत असून, उमरगा तालुक्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे.
उमरगा तालुक्यातील तुरोरी जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या दाबका मतदान केंद्रावर 104 वर्षांच्या सयदाबी बाबन पटेल यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या आजीने सांगितले की, “जिवंत असताना तोपर्यंत मी मतदान करणारच,” अशी ठाम भूमिका घेत लोकशाहीबद्दल आपली बांधिलकी दर्शवली.
सद्यस्थितीत तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर नागरिक उत्साहाने आपला हक्क बजावत असून, मतदान प्रक्रियेला सुरळीत आणि शांत वातावरणात पार पडत असल्याचे दिसून येत आहे.
सयदाबी बाबन पटेल यांसारख्या नागरिकांच्या सहभागामुळे तरुण मतदारांमध्येही लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याची प्रेरणा निर्माण होत आहे.