अष्टगंधाने 103 ठेवीदारांना घतला आठ कोटींचा गंडा

संचालक मंडळाच्या विरोधात तक्रार दाखल पणजी : अष्टगंधा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीने 103 ठेवीदारांना 8 कोटी ऊपयांना गंडा घातला असून सोसायटीच्या संचालक मंडळाच्या विरोधात ठेविदारांनी आर्थिक गुन्हा विरोधी विभागात (इओसी) तक्रार दाखल केली आहे, असे अॅड. साहिल सरदेसाई यांनी सांगितले. सोसायटीमधील ज्यांनी कोणी घोटाळा केला आणि ठेविदारांचे पैसे लुटले आहेत, त्याच्या विरोधात कारवाई करून ठेविदारांचे […]

अष्टगंधाने 103 ठेवीदारांना घतला आठ कोटींचा गंडा

संचालक मंडळाच्या विरोधात तक्रार दाखल
पणजी : अष्टगंधा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीने 103 ठेवीदारांना 8 कोटी ऊपयांना गंडा घातला असून सोसायटीच्या संचालक मंडळाच्या विरोधात ठेविदारांनी आर्थिक गुन्हा विरोधी विभागात (इओसी) तक्रार दाखल केली आहे, असे अॅड. साहिल सरदेसाई यांनी सांगितले. सोसायटीमधील ज्यांनी कोणी घोटाळा केला आणि ठेविदारांचे पैसे लुटले आहेत, त्याच्या विरोधात कारवाई करून ठेविदारांचे पैसे त्यांना परत मिळवून द्यावेत, अशी आमची मागणी असल्याचेही सरदेसाई म्हणाले. सोसायटी विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सरदेसाई पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत अनेक ठेविदार उपस्थित होते. गेल्या 9 महिन्यांपासून ठेवीदार आपल्या पैशांसाठी हेलपाटे मारीत आहेत. मात्र त्याची दखल कुणीच घेतली नाही. मुख्यमंत्र्यापासून सर्व संबंधीत कार्यालयात पत्रे देण्यात आली. अखेर आम्हाला न्यायालयाची दारे ठोठावी लागली. न्यायालयाने प्रशासक नियुक्त करण्याचा आदेश दिल्यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. प्रशासक मंडळाला नोटीस पाठवत आहे, मात्र त्याला कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद दिला जात नाही, म्हणून संबंधितांवर गुन्हा नोंद करावा आणि कारवाई करावी, अशी आमची मागणी असल्याचेही सरदेसाई म्हणाले.

Go to Source