मुंबईतील 102 बेकरी चालकांना काम थांबवण्याची नोटीस

मुंबई (mumbai) शहरात प्रदूषणाची पातळी वाढली आहे. वाहनांचा धूर, अनधिकृत बांधकाम यासह बेकरीच्या चिमण्यातून होणारा धूर देखील प्रदुषणासाठी कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. अशातच हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबईतील बेकऱ्यांना इंधनाचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच मुंबई महापालिकेने (brihanmumbai municipal corporation) कारवाईचा इशारा दिल्यानंतर ही दुर्लक्ष करणाऱ्या 102 बेकरीचालकांना स्टॉप वर्क नोटीस बजावण्यात आली आहे. तर कारवाईचा इशारा देताच 175 बेकरीचालकांनी लाकडाऐवजी इंधनाचा (green fuel) वापर करण्यास सुरुवात केली आहे. 69 बेकऱ्यांमध्ये इंधनाचा वापर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे उपायुक्त अविनाश काटे यांनी दिली. मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबईतील बेकऱ्या आणि इतर व्यवसायांमध्ये लाकूड आणि कोळशाचा वापर बंद करण्याचे आदेश मुंबई पालिका प्रशासन आणि प्रदूषण मंडळाने दिले आहेत. उच्‍च न्‍यायालयानेही (bombay high court) 9 जानेवारी 2025 रोजी घेतलेल्‍या सुनावणीत 6 महिन्‍यांच्‍या मुदतीत लाकूड आणि कोळसा याऐवजी पर्यायी स्‍वच्‍छ इंधनाचा अवलंब करण्‍याचे आदेश व्‍यावसायिकांना दिले आहेत. मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने लाकूड व कोळसा वापरणाऱ्या बेकऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. तसेच त्यांना पीएनजी किंवा एलपीजी यांसारख्या इंधनावर स्थलांतरित करणे अनिवार्य केले आहे. तसेच बेकरीचालक लाकडाऐवजी इंधनाचा वापर करत नसल्याचे निदर्शनास आल्यावर संबंधित बेकरीचालकाचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.हेही वाचा हाजी अली दर्ग्यावर जगातील सर्वात उंच तिरंगा उभारण्याचा प्रस्ताव मुंबईत उष्णतेची लाट, IMD कडून यलो अलर्ट

मुंबईतील 102 बेकरी चालकांना काम थांबवण्याची नोटीस

मुंबई (mumbai) शहरात प्रदूषणाची पातळी वाढली आहे. वाहनांचा धूर, अनधिकृत बांधकाम यासह बेकरीच्या चिमण्यातून होणारा धूर देखील प्रदुषणासाठी कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.अशातच हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबईतील बेकऱ्यांना इंधनाचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच मुंबई महापालिकेने (brihanmumbai municipal corporation) कारवाईचा इशारा दिल्यानंतर ही दुर्लक्ष करणाऱ्या 102 बेकरीचालकांना स्टॉप वर्क नोटीस बजावण्यात आली आहे. तर कारवाईचा इशारा देताच 175 बेकरीचालकांनी लाकडाऐवजी इंधनाचा (green fuel) वापर करण्यास सुरुवात केली आहे.69 बेकऱ्यांमध्ये इंधनाचा वापर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे उपायुक्त अविनाश काटे यांनी दिली.मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबईतील बेकऱ्या आणि इतर व्यवसायांमध्ये लाकूड आणि कोळशाचा वापर बंद करण्याचे आदेश मुंबई पालिका प्रशासन आणि प्रदूषण मंडळाने दिले आहेत. उच्‍च न्‍यायालयानेही (bombay high court) 9 जानेवारी 2025 रोजी घेतलेल्‍या सुनावणीत 6 महिन्‍यांच्‍या मुदतीत लाकूड आणि कोळसा याऐवजी पर्यायी स्‍वच्‍छ इंधनाचा अवलंब करण्‍याचे आदेश व्‍यावसायिकांना दिले आहेत.मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने लाकूड व कोळसा वापरणाऱ्या बेकऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. तसेच त्यांना पीएनजी किंवा एलपीजी यांसारख्या इंधनावर स्थलांतरित करणे अनिवार्य केले आहे. तसेच बेकरीचालक लाकडाऐवजी इंधनाचा वापर करत नसल्याचे निदर्शनास आल्यावर संबंधित बेकरीचालकाचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.हेही वाचाहाजी अली दर्ग्यावर जगातील सर्वात उंच तिरंगा उभारण्याचा प्रस्तावमुंबईत उष्णतेची लाट, IMD कडून यलो अलर्ट

Go to Source