दाणोली पाटयेकर माध्य.विद्यालयाचं १०० टक्के यश

ओटवणे | प्रतिनिधी दाणोली येथील कै बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालयाचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. असून या शाळेने उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. या प्रशालेतून परीक्षेला बसलेले सर्व १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन विशेष श्रेणीत ११ तर प्रथम श्रेणीत ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या शाळेतून प्रथम क्रमांक रिया गुरुनाथ ढवळे ८७.८०%, द्वितीय क्रमांक […]

दाणोली पाटयेकर माध्य.विद्यालयाचं १०० टक्के यश

ओटवणे | प्रतिनिधी
दाणोली येथील कै बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालयाचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. असून या शाळेने उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. या प्रशालेतून परीक्षेला बसलेले सर्व १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन विशेष श्रेणीत ११ तर प्रथम श्रेणीत ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या शाळेतून प्रथम क्रमांक रिया गुरुनाथ ढवळे ८७.८०%, द्वितीय क्रमांक रोशनी दशरथ कोकरे ८७.४०%, तर तृतीय क्रमांक देवयानी संजय सावंत ८५.६० % या विद्यार्थ्यांनी पटकाविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री पाटयेकर, सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक जयवंत पाटील आणि शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.