गोवा विद्यापीठाला केंद्राकडून 100 कोटी
‘मेऊ’ योजनेखाली पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मंजूर
पणजी : गोवा विद्यापीठाचा दर्जा वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 कोटीची रक्कम मंजूर केली आहे. ‘मल्टी डिसिप्लीनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटी’ या ‘मेऊ’ योजनेखाली हा निधी मंजूर करण्यात आला असून त्यातून विद्यापीठाचा शैक्षणिक कायापालट होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या निधीबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानून त्यांना धन्यवाद दिले आहेत. त्यामुळे गोवा विद्यापीठाची क्षमता, दर्जा, मानांकन वाढण्यास मदत होणार असल्याचे डॉ. सावंत यांनी म्हटले आहे. नवीन शैक्षणिक धोरण गोवा विद्यापीठात चांगल्या पद्धतीने राबविणे शक्य होणार असल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले आहे. या निधीमुळे गोवा विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांमध्ये वृद्धी आणि बदल होणार असून कौशल्य विकासाचे तसेच इतर क्षेत्रातील नवीन कोर्स सुरू केले जातील. ज्या क्षेत्रातील अभ्यासक्रम विद्यापीठात नाहीत ते सुरू करण्याची संधी या निधीमुळे प्राप्त होणार आहे. गोवा विद्यापीठ हे एक संशोधन केंद्र म्हणून आणखी विकसित होण्यासाठी वाव मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोवा विद्यापीठ सध्या आर्थिक साहाय्याच्या प्रतीक्षेत होते आणि योग्यवेळी केंद्राची मदत मंजूर झाल्याचे सांगण्यात आले.
Home महत्वाची बातमी गोवा विद्यापीठाला केंद्राकडून 100 कोटी
गोवा विद्यापीठाला केंद्राकडून 100 कोटी
‘मेऊ’ योजनेखाली पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मंजूर पणजी : गोवा विद्यापीठाचा दर्जा वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 कोटीची रक्कम मंजूर केली आहे. ‘मल्टी डिसिप्लीनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटी’ या ‘मेऊ’ योजनेखाली हा निधी मंजूर करण्यात आला असून त्यातून विद्यापीठाचा शैक्षणिक कायापालट होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या निधीबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानून […]