ठाणे: एप्रिल महिन्यात टीएमटीच्या ताफ्यात एसी ई-बस दाखल होणार

पीएम (PM) ई बस (e-bus) सेवा’ योजनेअंतर्गत, केंद्र सरकारने ठाणे (thane) महानगरपालिकेच्या (thane municipal corporation) वाहतूक सेवेसाठी 100 पर्यावरणपूरक वातानुकूलित ई-बस मंजूर केल्या आहेत. ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के यांनी आश्वासन दिले आहे की, ते अधिक बसेस आणि उर्वरित केंद्र सरकारच्या अनुदानासाठी प्रयत्नशील आहेत. मगुंता श्रीनिवासुलु रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली संसदेत नगरविकास आणि गृहनिर्माण स्थायी समितीची बैठक झाली. खासदार (loksabha MP) नरेश म्हस्के (naresh mhaske) या समितीचे सदस्य म्हणून बैठकीला उपस्थित होते. बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले की ठाणेकरांच्या सेवेसाठी 100 वातानुकूलित आरामदायी ई-बस उपलब्ध करून दिल्या आहेत. ज्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. तसेच, ठाणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, ठाणे वाहतूक सेवेला अधिक बसेस देण्यात याव्यात अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली. कोविड-19 साथीच्या आजाराशी झुंजत असलेल्या टीएमसीवरील आर्थिक भार कमी करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या अनुदानात खासदार नरेश म्हस्के यांनी 5 रुपये वाढ करण्याचा म्हणजेच प्रति किमी 24 रुपयांऐवजी 29 रुपये करण्याचे सांगितले आहे. तसेच योजनेसाठी किमान अंतराची आवश्यकता 200 किमीवरून 160 किमी पर्यंत कमी करण्याचा सल्ला दिला आहे. या बदलामुळे ही योजना नागरिकांसाठी अधिक सुलभ आणि फायदेशीर होईल, असे त्यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले. खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्र सरकार ज्याप्रमाणे ठाणे वाहतूक सेवेला सहकार्य करत आहे, त्याचप्रमाणे देशातील इतर राज्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वाहतूक सेवांनाही सहकार्य करावे, असे सुचवले. बैठकीला उपस्थित असलेल्या इतर खासदारांनी म्हस्के यांच्या सूचनेचे स्वागत केले.हेही वाचा बीडीडी चाळीतील रहिवाशांना ‘या’ महिन्यात मिळणार घरं कळवा, दिवा आणि मुंब्रा परिसरात पाणीकपात

ठाणे: एप्रिल महिन्यात टीएमटीच्या ताफ्यात एसी ई-बस दाखल होणार

पीएम (PM) ई बस (e-bus) सेवा’ योजनेअंतर्गत, केंद्र सरकारने ठाणे (thane) महानगरपालिकेच्या (thane municipal corporation) वाहतूक सेवेसाठी 100 पर्यावरणपूरक वातानुकूलित ई-बस मंजूर केल्या आहेत. ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के यांनी आश्वासन दिले आहे की, ते अधिक बसेस आणि उर्वरित केंद्र सरकारच्या अनुदानासाठी प्रयत्नशील आहेत.मगुंता श्रीनिवासुलु रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली संसदेत नगरविकास आणि गृहनिर्माण स्थायी समितीची बैठक झाली. खासदार (loksabha MP) नरेश म्हस्के (naresh mhaske) या समितीचे सदस्य म्हणून बैठकीला उपस्थित होते.बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले की ठाणेकरांच्या सेवेसाठी 100 वातानुकूलित आरामदायी ई-बस उपलब्ध करून दिल्या आहेत. ज्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. तसेच, ठाणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, ठाणे वाहतूक सेवेला अधिक बसेस देण्यात याव्यात अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली.कोविड-19 साथीच्या आजाराशी झुंजत असलेल्या टीएमसीवरील आर्थिक भार कमी करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या अनुदानात खासदार नरेश म्हस्के यांनी 5 रुपये वाढ करण्याचा म्हणजेच प्रति किमी 24 रुपयांऐवजी 29 रुपये करण्याचे सांगितले आहे. तसेच योजनेसाठी किमान अंतराची आवश्यकता 200 किमीवरून 160 किमी पर्यंत कमी करण्याचा सल्ला दिला आहे. या बदलामुळे ही योजना नागरिकांसाठी अधिक सुलभ आणि फायदेशीर होईल, असे त्यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले. खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्र सरकार ज्याप्रमाणे ठाणे वाहतूक सेवेला सहकार्य करत आहे, त्याचप्रमाणे देशातील इतर राज्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वाहतूक सेवांनाही सहकार्य करावे, असे सुचवले. बैठकीला उपस्थित असलेल्या इतर खासदारांनी म्हस्के यांच्या सूचनेचे स्वागत केले.हेही वाचाबीडीडी चाळीतील रहिवाशांना ‘या’ महिन्यात मिळणार घरंकळवा, दिवा आणि मुंब्रा परिसरात पाणीकपात

Go to Source