फटाके कारखाना स्फोटात तामिळनाडूत 10 ठार

वृत्तसंस्था/ चेन्नई तामिळनाडूतील विरुधुनगर येथील फटाक्यांच्या कारखान्यात शनिवारी झालेल्या स्फोटात किमान 10 जणांचा मृत्यू झाला. या स्फोटात आणखी तीन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे. प्राथमिक तपासानुसार मृतांमध्ये 4 महिलांचाही समावेश आहे. या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी शोकसंतप्त कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 3 लाख रु पये […]

फटाके कारखाना स्फोटात तामिळनाडूत 10 ठार

वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूतील विरुधुनगर येथील फटाक्यांच्या कारखान्यात शनिवारी झालेल्या स्फोटात किमान 10 जणांचा मृत्यू झाला. या स्फोटात आणखी तीन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे. प्राथमिक तपासानुसार मृतांमध्ये 4 महिलांचाही समावेश आहे. या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी शोकसंतप्त कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 3 लाख रु पये आणि गंभीर जखमींना प्रत्येकी 1 लाख रु पयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राज्यातील दोन मंत्र्यांना बचाव आणि मदतकार्यात समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
फटाके बनवणाऱ्या कारखान्यातील केमिकल मिक्सिंग रूममध्ये शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. सुऊवातीला स्फोटात नऊ जण ठार झाले होते आणि तीन गंभीर जखमींना उपचारासाठी शिवकाशी येथील सरकारी ऊग्णालयात नेण्यात आल्याचे विऊधुनगरचे जिल्हा दंडाधिकारी व्ही. पी. जयसीलन यांनी सांगितले. उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला. अन्य दोघांवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राज्याचे महसूल मंत्री केकेएसआर रामचंद्रन आणि कामगार मंत्री सी. व्ही. गणेशन यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे आणि बचाव आणि मदतकार्य सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.