सर्वोच्च न्यायालयात आयएमएकडून क्षमायाचना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पतंजली जाहिरात प्रकरणात भारतीय वैद्यकीय संघटनेकडून (आयएमए) जाहीर क्षमायाचना करण्यात आली आहे. या संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. व्ही. अशोकन यांनी गुरुवारी ही कृती केली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तसा आदेश दिला होता. डॉ. अशोकन यांनी एका मुलाखतीत काही टिप्पणी केली होती, जिच्यामुळे वाद निर्माण झाला होता. पतंजली जाहिरात प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असून त्यात अंतिम निर्णय अद्याप देण्यात आलेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करण्याचा आपला हेतू नव्हता. मी नेहमी सर्वोच्च न्यायालयासंबंधी आदर बाळगला आहे. मात्र, अनवधानाने केल्या गेलेल्या टिप्पणीसंबंधी मी जाहीररित्या क्षमा याचना करीत आहे, असे अशोकन यांनी त्यांच्या क्षमायाचना पत्रात स्पष्ट केले आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात क्षमा याचना करीत असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते.
न्यायालयाची टिप्पणी काय होती…
पतंजली भ्रामक जाहिरात प्रकरणी न्यायालयाने या कंपनीचे चालक बाबा रामदेव यांना फटकारले होते. त्यांना अशा जाहिराती प्रसिद्ध केल्यामुळे क्षमायाचना करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्याच निर्णयपत्रात सर्वोच्च न्यायालयाने आयएमएसंबंधीही काही निरीक्षणे नोंदविली होती. या संस्थेचे सदस्य डॉक्टर्स रुग्णांना महागडी औषधे लिहून देतात. तसेच अनावश्यक चाचण्याही करावयास लावतात. यामुळे रुग्णांना मोठा आर्थिक फटका बसतो, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यासंबंधात डॉ. अशोकन यांनी काही वक्तव्य केले होते.
Home महत्वाची बातमी सर्वोच्च न्यायालयात आयएमएकडून क्षमायाचना
सर्वोच्च न्यायालयात आयएमएकडून क्षमायाचना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली पतंजली जाहिरात प्रकरणात भारतीय वैद्यकीय संघटनेकडून (आयएमए) जाहीर क्षमायाचना करण्यात आली आहे. या संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. व्ही. अशोकन यांनी गुरुवारी ही कृती केली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तसा आदेश दिला होता. डॉ. अशोकन यांनी एका मुलाखतीत काही टिप्पणी केली होती, जिच्यामुळे वाद निर्माण झाला होता. पतंजली जाहिरात प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात […]