संयुक्त शोधमोहिमेवेळी मणिपूरमध्ये शस्त्रसाठा जप्त

वृत्तसंस्था/ इंफाळ मणिपूरच्या नोनी जिल्ह्यातील कौबुरू रिज परिसरात राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेवेळी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. आसाम रायफल्स आणि स्थानिक पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून येथे विशेष शोधमोहीम हाती घेतली होती. एके 56 रायफल, सिंगल बॅरल गन, दारूगोळा, ग्रेनेड आणि काडतुसे असा मोठा शस्त्रास्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती रविवारी देण्यात आली. […]

संयुक्त शोधमोहिमेवेळी मणिपूरमध्ये शस्त्रसाठा जप्त

वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरच्या नोनी जिल्ह्यातील कौबुरू रिज परिसरात राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेवेळी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. आसाम रायफल्स आणि स्थानिक पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून येथे विशेष शोधमोहीम हाती घेतली होती. एके 56 रायफल, सिंगल बॅरल गन, दारूगोळा, ग्रेनेड आणि काडतुसे असा मोठा शस्त्रास्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती रविवारी देण्यात आली. यापूर्वी 6 डिसेंबर रोजी आसाम रायफल्सने बीएसएफ, भारतीय राखीव बटालियन आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत चुराचंदपूर जिल्ह्यातील डी हाओलेंजंग गावातून शस्त्रे जप्त केली होती.