शहरातील सरकारी शाळा-कॉलेजची लाखांची थकबाकी
हेस्कॉमकडून सूचना : मोफत विजेची अद्याप अंमलबजावणी नाही
बेळगाव : सरकारी शाळा, तसेच पदवीपूर्व कॉलेजमधील वीजबिल मागील अनेक महिन्यांपासून थकीत आहे. राज्य सरकारने शाळांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला नसला तरी अद्याप बिल भरण्यात आलेले नाही. त्यामुळे शहरातील शाळांकडे 4 लाख 94 हजार तर पदवीपूर्व कॉलेजकडे 3 लाख 8 हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.राज्य सरकारने घरगुती ग्राहकांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. त्या पाठोपाठ सरकारी शाळांनाही मोफत वीज देण्याचा निर्णय झाला. परंतु त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही.
राज्य सरकारचा निर्णय झाला असल्याने शाळांनीही वीजबिल थकित ठेवले होते. परंतु थकबाकी वाढत जात असल्याने अखेर मागील महिन्यापासून हेस्कॉमने संबंधित शाळांना थकीत बिल पाठवून वीज बिल तोडण्याचा इशारा दिला.बेळगाव शहर विभागामध्ये एकूण 92 सरकारी शाळांमधून 4 लाख 94 हजार थकबाकी शिल्लक आहे. तर 14 सरकारी पदवीपूर्व कॉलेजमधील 3 लाख 8 हजार रुपयांची थकबाकी शिल्लक असल्याची माहिती हेस्कॉमकडून देण्यात आली आहे. थकबाकी वाढत असल्याने विजेचे बिल भरण्याची सूचना करण्यात आली होती. परंतु कोणत्याही शाळेचे कनेक्शन तोडू नये, अशा सूचना राज्य सरकारने हेस्कॉमसह सर्वच वितरण कंपन्यांना दिल्या आहेत.
अनेक कॉम्प्युटर लॅब बंद अवस्थेत
ज्या सरकारी शाळांमध्ये पटसंख्या अधिक आहे, त्या शाळांमध्ये संगणक देण्यात आले आहेत. संगणकासाठी दररोज अधिक प्रमाणात विजेचा वापर होत असल्याने त्या शाळांचे बिल महिन्याकाठी चार-पाच हजार रुपये येत आहे. सरकारकडून येणारे अनुदान तुटपुंजे असल्याने शिक्षकांना पदरमोड करून ही रक्कम भरावी लागत आहे. काही शाळांनी बिल भरणे शक्य नसल्याने कॉम्प्युटर लॅब बंद ठेवल्या आहेत.
Home महत्वाची बातमी शहरातील सरकारी शाळा-कॉलेजची लाखांची थकबाकी
शहरातील सरकारी शाळा-कॉलेजची लाखांची थकबाकी
हेस्कॉमकडून सूचना : मोफत विजेची अद्याप अंमलबजावणी नाही बेळगाव : सरकारी शाळा, तसेच पदवीपूर्व कॉलेजमधील वीजबिल मागील अनेक महिन्यांपासून थकीत आहे. राज्य सरकारने शाळांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला नसला तरी अद्याप बिल भरण्यात आलेले नाही. त्यामुळे शहरातील शाळांकडे 4 लाख 94 हजार तर पदवीपूर्व कॉलेजकडे 3 लाख 8 हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.राज्य सरकारने घरगुती ग्राहकांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज […]