विमान कोसळून नेपाळमध्ये 18 ठार

पायलट बचावला : काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुर्घटना वृत्तसंस्था/ काठमांडू नेपाळची राजधानी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सकाळी खासगी विमान कंपनी सौर्य एअरलाईन्सचे विमान उड्डाण घेत असताना कोसळले. या दुर्घटनाप्रसंगी विमानात तांत्रिक कर्मचारी आणि क्रू सदस्यांसह 19 जण होते. त्यापैकी 18 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून केवळ पायलट बचावला आहे. जखमी पायलटची प्रकृती […]

विमान कोसळून नेपाळमध्ये 18 ठार

पायलट बचावला : काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुर्घटना
वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळची राजधानी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सकाळी खासगी विमान कंपनी सौर्य एअरलाईन्सचे विमान उड्डाण घेत असताना कोसळले. या दुर्घटनाप्रसंगी विमानात तांत्रिक कर्मचारी आणि क्रू सदस्यांसह 19 जण होते. त्यापैकी 18 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून केवळ पायलट बचावला आहे. जखमी पायलटची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर इस्पितळात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.
दुर्घटनाग्रस्त विमान काठमांडूहून पोखरासाठी उ•ाण घेत असताना बुधवारी सकाळी क्रॅश झाले. उड्डाणानंतर ते काही वेळातच कोसळल्याचे विमानतळावर तैनात असलेल्या एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले. विमानातील बचावलेल्या पायलटला ऊग्णालयात नेण्यात आले आहे. सौर्य एअरलाईन्सच्या 9एन-एएमई (सीआरजे200) विमानाने काठमांडूहून पोखरासाठी स्थानिक वेळेनुसार सकाळी 11:11 वाजता उड्डाण करताच उजवीकडे वळले आणि धावपट्टीच्या पूर्वेकडील एका जागी कोसळले. त्यानंतर विमानाला आग लागली. विमानातील आग आटोक्मयात आणण्यात आली आहे. तसेच ब्लॅकबॉक्ससह त्याचे सर्व अवशेष विमानतळ प्राधिकरणाने ताब्यात घेतले आहेत. घटनेची माहिती मिळताच अपघातस्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत व बचावकार्य राबवले.

टेकऑफ दरम्यान अपघात
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोखराहून निघालेले सौर्य एअरलाईन्सचे विमान टेकऑफवेळी धावपट्टीवरून घसरल्याने हा अपघात झाला. विमानात चालक दलातील सदस्यांसह 19 जण होते. यापैकी अपघातस्थळावरून 18 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. जहाजाचा कॅप्टन एमआर शाक्मय यांना ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्यात आले आहे. विमानतळावर धुराचे दाट ढग दिसत होते.
रक्तबंबाळ पायलटला जीवदान
विमानाच्या क्रूमध्ये पॅप्टन मनीष रत्न शाक्मय आणि सहवैमानिक सुशांत कटुवाल यांचा समावेश होता. यापैकी मनीष रत्न शाक्मय यांना जीवदान मिळाले आहे. मदत व बचाव पथकाने त्यांना रक्तबंबाळ आणि गंभीर जखमी अवस्थेत विमानाच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले आहे. त्याच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार, मनीष शाक्य हे सध्या शौर्य एअरलाईन्समध्ये कार्यरत आहेत. ते काठमांडूचे रहिवासी असून त्यांचे शालेय शिक्षण सेंट झेवियर्स स्कूल आणि मसुरी मॉडर्न स्कूलमधून झाले. 2012 मध्ये त्यांनी सिम्रिक एअरलाईन्समध्ये पायलट म्हणून करिअरला सुऊवात केली. शाक्मय फेब्रुवारी 2012 ते डिसेंबर 2014 पर्यंत सिमरी एअरलाईन्सशी संबंधित होते. यानंतर ते सौर्य एअरलाईन्समध्ये ऊजू झाले. डिसेंबर 2014 पासून ते आतापर्यंत फक्त शौर्य एअरलाईन्ससाठी काम करत आहेत.
नेपाळमध्ये 2023 मध्येही मोठा विमान अपघात
गेल्यावषीही नेपाळमध्ये विमान अपघातात 72 जणांचा मृत्यू झाला होता. 2023 मध्ये यती एअरलाईन्सच्या विमानाला नेपाळमध्ये अपघात झाला. यती एअरलाईन्सच्या अपघातात प्राण गमावलेल्यांमध्ये पाच भारतीयांचाही समावेश होता. यती एअरलाईन्सचा अपघात वैमानिकाच्या चुकांमुळे झाल्याचे तपासात समोर आले होते.