राशिभविष्य
बुधवार दि.26 जून तं मंगळवार दि. 2 जुलैपर्यंत
एखादी गोष्ट सांगितल्यानंतर किंवा एखादा मुद्दा मांडल्यानंतर तो कसा बरोबर आहे हे सादिक करून दाखवण्याची जबाबदारी सुद्धा लेखकावर असते. वैवाहिक गुण मिलन चुलीत घाला, असे म्हणाल्यानंतर माझी ही जबाबदारी असते की, हे चुकीचे कसे आहे हे वाचकांना सांगावे. पण बहुसंख्य लोकांना फक्त किती गुण मिळाले याच्याशी देणे घेणे असते. उदाहरणार्थ सांगायचे झाले तर बहुसंख्य आपली माणसे म्हणजे आपल्या इथे भारतात राहणारे लोक, घटना कधी घडेल हे विचारतात किंवा त्यांचा फोकस घटनेवर असतो. उदाहरण सांगायचे झाले तर लग्न कधी होईल, मूल कधी होईल, नोकरी कधी लागेल, व्यवसाय चांगला कधी चालेल इत्यादी इत्यादी. पण बाहेरचे लोक म्हणजे पाश्चात्य लोक घटना कधी घडेल, यापेक्षा त्या घटनेचा परिणाम कसा असेल इंग्रजीमध्ये ज्याला म्हणतात म्हणजे याचाच अर्थ घटनेचे परिणाम कसे असतील. यामध्ये त्यांचा जास्त असतो, आपल्याला ही गोष्ट त्यांच्याकडून शिकायला हवी. लग्न कधी होईल यापेक्षाही लग्न झाल्यानंतर ते आयुष्य कसे असेल हे महत्त्वाचे नाही का? तर माझा मुद्दा हा होता की बहुसंख्य वाचकांना बहुसंख्य लोकांना हे अष्टकूट मिलान काय आहे हेच माहीत नसते बऱ्याच लोकांना फक्त योनी ग्रह, मैत्री नाडी एवढे शब्द ऐकून माहीत असतात. जाणून घेऊया पहिल्यांदा हे अष्टकूट मिलान काय आहे आणि नंतर मी स्पष्ट करतो की हे का व्यर्थ आहे. त्याचबरोबर हेही सांगतो की यातील काय घेण्यासारखे आहे. आजही भारतात लग्न हे कमी-अधिक प्रमाणात सार्वत्रिक आहे. ‘विवाह’ किंवा विवाह हा 16 संस्कार किंवा धार्मिक आचार/संस्कारांपैकी एक आहे. संस्कार हे एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील वेगवेगळे निर्णायक वळण आहेत; म्हणून त्यांचा आदर केला जातो आणि साजरा केला जातो. हिंदू धर्मग्रंथात लग्नाला जन्मापूर्वीच ठरवलेले एक अतिशय पवित्र मिलन मानतात. त्यामुळे संभाव्य जोडप्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि वर्तणुकीशी सुसंगतता समजून घेण्यासाठी मॅच मेकिंगला खूप महत्त्व आहे. बदलती सामाजिक-आर्थिक परिस्थिती आणि कौटुंबिक जीवनात स्त्रियांची स्थिती आणि भूमिकेत आमूलाग्र बदल करून विवाह जुळवणीला आता अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमीची तुलना करण्यासोबतच, संभाव्य वधू/वर आणि त्यांच्या पालकांना त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी, सुसंवादी आणि फलदायी असेल की नाही याची खात्री करून घेण्यातही रस असतो. गुण मिलन हे मॅच मेकिंगमध्ये मिसळले जाणार नाही; तो प्रत्यक्षात कुंडली मिलनचा एक भाग आहे. उत्तर भारतात, गुण जुळवण्याची एक अतिशय पारंपरिक, पण सोपी पद्धत पाळली जाते ज्याला ‘अष्टकूट मिलन’ म्हणतात. याचा शाब्दिक अर्थ ‘आठ गुण किंवा पैलूंची जुळणी’ असा होतो. ‘अष्ट’ म्हणजे आठ आणि ‘कूट’ म्हणजे ‘पैलू’. या आठ पैलू किंवा कुटांना जोडप्याच्या सुसंगततेचे वेगवेगळे पैलू ठरवण्यात त्यांचे महत्त्व किंवा भूमिका यावर अवलंबून विशिष्ट संख्यात्मक मूल्य दिले जाते. वर्ण, वश्य, तारा, योनी, ग्रह मैत्री, गण, भकूट आणि नाडी हे आठ गुण आहेत. दुसरीकडे, दक्षिण भारतात मॅच मेकिंगची एक अधिक व्यापक आणि गुंतागुंतीची पद्धत अवलंबली जाते जी ‘दशकूट (दहा पैलू) मिलान’ म्हणून ओळखली जाते. या पद्धतीत महेंद्र कूट, दीर्घ कूट, वेधा कूट आणि रज्जू कूट यांचाही वरील आठ कुटांच्या व्यतिरिक्त विचार केला जातो. पाहुया हे काय आहे- 1. वर्ण-हे मुलगा आणि मुलगी यांच्या आध्यात्मिक अनुकूलतेचे प्रतिनिधित्व करते. हे दोघांच्या अहंकाराची पातळी आणि व्यक्तिमत्त्व प्रदर्शित करते. वर्ण कुटाची जुळणी वैवाहिक जीवनात परस्पर प्रेम आणि आरामाचे अस्तित्व सुनिश्चित करते. 2. वाश्य-हे परस्पर आकर्षण आणि भागीदार एकमेकांवर किती प्रमाणात प्रभाव टाकू शकतील याचे मोजमाप करते. दुसऱ्या शब्दात, ते दोनमधील शक्ती समीकरणाची गणना करते. 3. तारा-तारा किंवा दिना कूटा भावी जोडप्याचे आरोग्य आणि दीर्घायुष्य दर्शवते. त्याची सुसंगतता हे सुनिश्चित करते की जोडपी रोगमुक्त राहतील आणि दीर्घायुषी राहतील. ज्यामुळे त्यांना सुखी वैवाहिक जीवनातील सुखसोयींचा आनंद घेता येईल. 4. योनी-योनी कूटा भावी जोडप्याच्या जवळीक पातळी, लैंगिक अनुकूलता आणि परस्पर प्रेम मोजते. हे दोन्हीच्या कामुक स्वभाव आणि वैशिष्ट्यांशी जुळते. 5. गृह मैत्री-हे भागीदारांमधील मानसिक अनुकूलता, आपुलकी आणि नैसर्गिक मैत्री प्रतिबिंबित करते. मुलगा आणि मुलगी एकमेकांसाठी किती वैमनस्यपूर्ण आहेत हे यावरून दिसून येते. 6. गण-गण हे भावी वधू आणि वर यांचे परस्पर वर्तन, मानसिक अनुकूलता आणि स्वभाव दर्शवितात. हा एक महत्त्वाचा घटक आहे जो भागीदारांच्या सुसंगतता स्तरांवर परिणाम करतो. 7. भाकूटा-हे जोडप्याच्या भावनिक अनुकूलतेचे प्रतिनिधित्व करते. हे एका भागीदाराचा दुसऱ्यावरील सापेक्ष प्रभाव आणि परस्पर समंजसपणा आणि मानसिक स्वीकृती लक्षात घेण्याची त्यांची क्षमता दर्शवते. 8. नाडी – नाडी जोडप्यामधील वात, पित्त आणि कफ यांच्या तुलनात्मक पातळीचे मोजमाप करते. हे संतती आणि बाळंतपणाच्या समस्यांवर परिणाम दर्शवते; हे भागीदारांच्या आरोग्यविषयक बाबी आणि चयापचयदेखील संबोधित करते.
मेष
हा आठवडा आपल्याला लाभदायक जाण्याची शक्मयता आहे. सभा समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल. वडीलधारी मंडळी, मोठ्या भावंडांची भेट होईल. उंची वस्तुंची खरेदी होण्याची शक्मयता आहे. किंवा उंची वस्तू भेट म्हणून मिळण्याचाही संभव आहे. आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न कराल. समाजात प्रतिष्ठा मिळण्याची शक्मयता आहे.
उपाय: मारुतीची उपासना करा.
वृषभ
परदेशवारी संभवते. या आठवड्यात कदाचित लांबचा प्रवास अथवा विदेशी प्रयाण तरी होण्याची शक्मयता आहे. वाहन सांभाळून व रहदारीचे सर्व नियम पाळून चालवा. नाहीतर दंड भरावा लागण्याची शक्मयता आहे. राजकारणात असाल तर वाणीवर संयम ठेवा. बोलण्यात चुकी झाल्यास लोकापवादाला सामोरे जावे लागण्याची शक्मयता आहे. सांभाळून रहा.
उपाय: दत्तगुरुचे नामस्मरण करा.
मिथुन
मनाला ताब्यात ठेवावे लागेल. सर्वच बाबतीत भटकू देऊ नका. एवढ्या तेवढ्या गोष्टीवर चिडचिड होण्याची शक्मयता आहे. त्यासाठी संयम ठेवा. जोडीदाराबरोबर संयमाने वागा. जोडीदाराची साथ मिळेलच. पण आपल्या बोलण्याने त्याचे मन दुखवू नका. आपली महत्त्वाकांक्षा जोडीदाराच्या साथीने पूर्ण करा. त्यात नक्की आनंद मिळेल. हा आठवडा आपल्याला संयम ठेवण्यास सांगतो आहे.
उपाय: राम नामाचा जप करा.
कर्क
काही देण्याघेण्याचा व्यवहार या आठवड्यात करत असाल तर त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. आपल्या कुटुंबासमवेत आणि नातेवाईकांच्या समवेत हा आठवडा छान आनंदात जाईल. आपल्या बोलण्याने दुसऱ्यांना आनंद द्याल. वडिलोपार्जित दाग-दागिने, धन मिळण्याचीदेखील शक्मयता आहे. पण त्यासाठी आपल्याच माणसांशी वादावादी नको.
उपाय: महादेवाची आराधना करा.
सिंह
आपल्या कामाची आपल्या वरिष्ठांवर छाप पडेल. आपल्या कामावर खूश होतील. पण त्या कामाच्या पूर्ततेसाठी कष्ट करावे लागतील. कदाचित या कामासाठी आपल्याला छोटे प्रवास करावे लागण्याची शक्मयता आहे. तुमच्या हाताखालील लोकाबरोबर किंवा घरातील नोकराबरोबर सलोख्याचे संबंध ठेवण्याची गरज आहे. यांची आपल्याला मदत होणार आहे. या कुणाशीही ऊक्षतेने बोलू नका.
उपाय: हनुमान चालिसा रोज वाचत जा.
कन्या
नवीन वाहन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर निर्णय घेण्यास विलंब लावू नका. जमीन खरेदी करणे अथवा विकणे या व्यवहारात सुद्धा फायदा होण्याची शक्मयता आहे. या सर्व व्यवहारामध्ये कदाचित आपल्याला आईची सुद्धा मदत होण्याची शक्मयता आहे. आईचा सहवास आपल्याला लाभेल. विद्यार्थी असाल तर आपली अभ्यासात प्रगती होण्याची शक्मयता आहे.
उपाय: नित्य नेमाने कुलदेवतेची पूजा करा.
तूळ
मुलांची शाळा सुरू झाली आहे. त्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. सुऊवातीच्या काळातच जास्त लक्ष द्यावे लागते. कारण काहीवेळा ती अजूनही सुट्टीच्या मूडमध्ये असतात. विद्यार्थ्यांनो, अभ्यासात थोडे लक्ष घातले तर तुमचे यश निश्चित आहे. लॉटरी वा तत्सम प्रकारातून द्रव्य लाभ संभवतो. विचारशक्ती वाढवण्याची गरज आहे. तुमच्या कामात त्याचा नक्कीच उपयोग होईल.
उपाय: इष्टदेवतेचे नामस्मरण करा.
वृश्चिक
या आठवड्यात आपल्याला खूप कष्ट करावे लागण्याची शक्मयता आहे. पण स्वत:च्या तब्येतीला सांभाळून कष्ट करा. यश नक्की आहे. या आठवड्यात आपल्याला आपल्या कामाचा पुरेपूर लाभ मिळण्याची शक्मयता आहे. पण चोरापासून सावध रहा. कुणावरही अति विश्वास ठेवू नका. मन थोडे चंचल, थोडे अस्वस्थ राहण्याची शक्मयता आहे. पण काळजी करू नका. स्वत:शी आणि कामाशी प्रामाणिक रहा.
उपाय: मुक्मया प्राण्यांना खाऊ घाला.
धनु
विवाहासंबंधी चर्चा चालू असल्यास जोडीदार सुंदर व हुशार मिळेल. विवाहित असाल तर जोडीदाराची चांगली साथ मिळेल. तुम्ही स्वतंत्र व्यवसायात असाल तर जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्या. फायदा होईल. जर आपले काम भागीदारीत असेल तर भागीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. व्यवसायात प्रगती होण्याची शक्मयता आहे. पण उगाचच कुणाशी वाद घालू नका.
उपाय: दर गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करा.
मकर
वाहन जपून चालवा. सासरकडून धनलाभ संभवतो. किंवा इतर कोणत्याही मार्गाने धनलाभ संभवतो. पण ते धन खूप विचार करून स्वीकारा. तो पैसा योग्य मार्गाने आला असेल तरच स्वीकारा. पैशाच्या मोहापायी नसते झंझट पदरी पाडून घेऊ नका. त्यामुळे तुमचेच नुकसान होण्याची शक्मयता आहे. कोणती तरी चिंता सतत सतावत राहण्याची शक्मयता आहे. सांभाळून रहा.
उपाय: दर शनिवारी शनीला तेल वाहा.
कुंभ
शक्मय होईल तेवढे धर्माचरण करीत रहा. तप, साधना करीत रहा. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. तीर्थाटन घडेल. पण प्रवासाचे नीट नियोजन करूनच बाहेर पडा. शक्मय होईल तेवढी संताची संगत धरा. त्यांचे आशीर्वाद घ्या. त्यांच्या सल्ल्यानेच वागा. गुरु आपल्याला केव्हाही सन्मार्गच दाखवतो. या आठवड्यात मन अस्थिर व चंचल होण्याचा संभव आहे.
उपाय: घराबाहेर पडताना गंधाचा टिळा लावून बाहेर पडा.
मीन
स्वतंत्र उद्योगात असाल तर प्रगती होण्याची शक्मयता आहे. नोकरीत असाल तर आपल्या कामावर आपले अधिकारी खूश असतील व आपली पदोन्नती करतील. आपल्या पगारात वाढ होण्याचा संभव आहे. आपली प्रतिष्ठा वाढेल. समाजात मानाचे स्थान प्राप्त होईल. कर्ज मिळविण्याच्या प्रयत्नात असाल तर आपल्याला कर्ज मिळण्याची शक्मयता आहे. एकंदरीत आठवडा छान जाईल.
उपाय: रोज नेमाने तुळशीला पाणी घाला.
Home महत्वाची बातमी राशिभविष्य
राशिभविष्य
बुधवार दि.26 जून तं मंगळवार दि. 2 जुलैपर्यंत एखादी गोष्ट सांगितल्यानंतर किंवा एखादा मुद्दा मांडल्यानंतर तो कसा बरोबर आहे हे सादिक करून दाखवण्याची जबाबदारी सुद्धा लेखकावर असते. वैवाहिक गुण मिलन चुलीत घाला, असे म्हणाल्यानंतर माझी ही जबाबदारी असते की, हे चुकीचे कसे आहे हे वाचकांना सांगावे. पण बहुसंख्य लोकांना फक्त किती गुण मिळाले याच्याशी देणे […]