मैत्रांगण

कधी कुणी एकत्र येऊन ग्रुप मैत्रांचा केला स्धापन केले त्याचे नामकरण म्हणती याला मैत्रांगण ।।

मैत्रांगण

friendship

कधी कुणी एकत्र येऊन

ग्रुप मैत्रांचा केला स्धापन

केले त्याचे नामकरण

म्हणती याला मैत्रांगण  ।।

 

विविध क्षेत्री रमुनी येती

सगळे येथे विश्रांतीला

सुख दुःखे ही वाटून घेती

आधार देती परस्पराला  ।।

 

कुणी टाकतो समर्थवाणी

कुणी मराठी हिंदी गाणी

कधी गीता अन् कधी कविता

तर कधी तुकयाची अभंगवाणी ।।

 

कधी हळहळ तर कधी अभिनंदन

स्मृतीदिनी कधी  थोरा वंदन

कधी किस्से,कधी वार्ता ताजी

समजून येते,होते रंजन  ।।

 

कधी चालते खेचाखेची

कधी शब्दांनी बाचाबाची 

कुणी कधी बसतो रागावून

आणती त्याला प्रेमे परतून  ।।

 

नकोच ईर्षा नको आगळिक

करु कागाळ्या लाडिक लाडिक

लगेच पण त्या विसरुन जाऊ

एकमेका समजून घेऊ ।।

 

मित्रांची या तऱ्हाच न्यारी

कुणी लावती नित्य हजेरी

कुणी मधे जाती डोकावून

कुणी ठेवती लक्ष दुरुन।।

 

किती किती  हे रंग वेगळे

प्रत्येकाचे ढंग आगळे

या सगळ्यांना सामावून

झुलत राहुदे मैत्रांगण  ।।

फुलत राहू दे मैत्रांगण   ।।

 

– सोशल मीडिया