मलेशियाची भारतावर मात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आशियायी कनिष्ठांच्या मिश्र सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मलेशियाने भारताचा 3-2 असा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. आता या स्पर्धेत भारतीय स्पर्धक वैयक्तिक गटात सहभागी होणार आहे. वैयक्तिक गटातील सामन्यांना बुधवारपासून प्रारंभ होईल. मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताने एक बदल केला आहे. भारताच्या संस्कार सारस्वत आणि श्रवणी वालेकर यांनी […]

मलेशियाची भारतावर मात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आशियायी कनिष्ठांच्या मिश्र सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मलेशियाने भारताचा 3-2 असा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. आता या स्पर्धेत भारतीय स्पर्धक वैयक्तिक गटात सहभागी होणार आहे. वैयक्तिक गटातील सामन्यांना बुधवारपासून प्रारंभ होईल.
मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताने एक बदल केला आहे. भारताच्या संस्कार सारस्वत आणि श्रवणी वालेकर यांनी सलामीच्या सामन्यात झींग आणि मेसराई यांचा 21-16, 13-21, 21-17 असा पराभव केला. त्यानंतर तन्वी शर्माने भारताची आघाडी वाढविताना एकेरीच्या सामन्यात झुलेकाचा 21-15, 15-21, 22-20 असा पराभव केला. त्यानंतर मुलांच्या एकेरीतील सामन्यात मोहम्मद फैकने भारताच्या प्रणय शेट्टीगारचा 15-21, 21-18, 21-19 असा पराभव केला. हा सामना 62 मिनीटे चालला होता. त्यानंतर झालेल्या सामन्यात मलेशियाच्या बुई आणि तिंग याने वालेकर व नव्या कांडेरी यांचा 21-16, 21-15 असा पराभव केला. मुलांच्या दुहेरी सामन्यात मलेशियाच्या केंग आणि तेई यांनी भारताच्या भार्गव अरगेला आणि अर्श मोहम्मद यांचा 21-18, 21-10 असा पराभव केल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले.