नंदिनी दूध दरात 2 रुपये वाढ
मोबदल्यात मिळणार 50 मि. लि. अतिरिक्त दूध : सुधारित दर आजपासून लागू : केएमएफचा निर्णय
प्रतिनिधी/ बेंगळूर
पेट्रोल-डिझेल दरवाढीपाठोपाठ आणि दूध दरातही वाढ झाली आहे. कर्नाटक दूध महामंडळाने (केएमएफ) दूध दरात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ केली आहे. ही दरवाढ बुधवार 26 जूनपासूनच लागू केली जात आहे.
दूध दरवाढीविषयी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना केएमएफचे अध्यक्ष भीमा नायक म्हणाले, 1 लिटर आणि अर्धा लिटर नंदिनी दूध पाकिटात अतिरिक्त 50 मि. लि. दूध ग्राहकांना दिले जाईल. अतिरिक्त 50 मि. लि. दुधाची किंमत 2 रुपये 10 पैसे इतकी होते. मात्र, 10 पैसे सोडून पाकिटात 50 मि. लि. अधिक दूध देऊन किंमत 2 रुपयांनी वाढविली आहे. बुधवारपासून 1 लिटर (1000 मि. लि.) दूध पाकिटात आता 1,050 मि. लि. आणि अर्धा लिटर (500 मि. लि.) पाकिटात 550 मि. लि. दूध मिळणार आहे. त्यामुळे अतिरिक्त दुधाचा येणाऱ्या खर्चामुळे किंमतीत 2 रु. अधिक आकारले जातील. प्रत्यक्षात दूध दरात वाढ केलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या नंदिनी दुधाच्या निळ्या रंगाच्या 1 लिटर पाकिटाची किंमत 42 रु. असून बुधवारपासून 44 रु. होईल. तर अर्धा लिटर दूध पाकिटाची किंमत 22 रु. वरून 24 रु. होणार आहे. नंदिनीच्या दही, ताक व इतर कोणत्याही उत्पादकांच्या किंमतीत बदल करण्यात आलेला नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्या सुगीचा काळ असल्याने सर्व दूध संकलन केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर दूध जमा होत आहे. प्रतिदिन 89 लाख लिटर होणारे दूध संकलन 1 कोटी लिटरपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे दूध उत्पादक आणि ग्राहक या दोहोंच्या हिताचा विचार करून दूध पाकिटांत अतिरिक्त 50 मि. लि. दूध अतिरिक्त देऊन त्या मोबदल्यात 2 रुपयांनी किंमत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती भीमा नायक यांनी दिली.
केएफएफने जारी केलेल्या आदेशपत्रकात दूध महामंडळाच्या विविध शाखांजवळ दूध पाकिटांचा जुना साठा शिल्लक आहे. त्यावर यापूर्वीचा दर आहे. त्यामुळे जुन्या पाकिटांचा साठा संपेपर्यंत त्यातूनच दूध पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केएमएफने केले आहे.
अतिरिक्त दुधापासून पावडर
नंदिनी दूध दरातील बदलाविषयी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राज्यात अतिरिक्त दुधापासून पावडर बनविली जाते. दररोज 30 लाख लिटर दुधापासून 150 मे. टन दूध पावडर बनविली जाते. ही दूध पावडरच्या मागणीला अनुसरून आहे. यापूर्वी दूध दर प्रतिलिटर 3 रु. वाढ करून ही रक्कम शेतकऱ्यांना प्रोत्साहनधन म्हणून दिली जात आहे. यामुळे दूध उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. परिणामी दुग्धोत्पादन यापूर्वीपेक्षा अधिक लाभदायक व्यवसाय बनला आहे, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले.
नंदिनी दुधाच्या दरात किती वाढ?
► टोन्ड दुधाची किंमत 22 ऊ. वरून 24 ऊ. प्रति 500 मिली (अर्धा लि.)असेल. 1 लिटरची किंमत 42 ऊ. वरून 44 ऊ. पर्यंत वाढणार आहे.
► होमोजीनाईज्ड टोन्ड दूध अर्धा लिटर 22 ऊ. वरून 24 ऊ. पर्यंत वाढेल तर एक लिटर दुधाची किंमत 43 ऊ. वरून 45 ऊपये होईल.
► होमोजीनाईज्ड गाईच्या दुधाची किंमत अर्धा लिटर 24 रु. वरून 26 ऊ. आणि 1 लिटर दुधाची किंमत 46 रु. वरून 48 ऊपये होईल.
► स्पेशल दूध अर्धा लि. 25 रु. वरून 27 ऊ. तर 1 लिटर दूध 48 वरून 50 ऊ. होईल.
► शुभम दूध 25 ऊपयांवरून 27 ऊपये प्रति अर्धा लिटर होईल. 1 लिटरचा दर 48 ऊ. वरून 50 ऊ. पर्यंत वाढणार आहे.
► समृद्धी दूध अर्धा लिटर 26 ऊपयांवरून 28 ऊ. आणि 1 लिटरसाठी 51 ऊ. वरून 53 ऊ. पर्यंत वाढणार आहे.
► होमोजीनाईज्ड शुभम दुधाची किंमत अर्धा लिटर 25 ऊ. वरून 27 ऊ., तर 1 लिटरची किंमत 49 ऊ. वरून 51 ऊ. पर्यंत वाढणार आहे.
► संतृप्ती दुधाचा दर अर्धा लि. 28 ऊपयांवरून 30 ऊ. आणि 1 लिटरचा दर 55 ऊ. वरून 57 ऊ. होणार आहे.
► शुभम गोल्ड दूध अर्धा लिटरचा दर 26 रु. वरून 28 ऊ. तर 1 लिटरसाठी 49 रु. वरून 51 ऊपये होईल.
► डबल टोन्ड दुधाची किंमत 21 ऊपयांवरून 23 ऊ. प्रति अर्धा लिटर आणि 1 लिटरची किंमत 41 वरून 43 ऊपयांपर्यंत वाढणार आहे.
कोट्स………
दूध दरवाढ नाही!
नंदिनी दूध पाकिटात दुधाचे प्रमाण वाढवून अतिरिक्त दुधासाठी 2 रु. दर निश्चित केला आहे. त्यामुळे ग्राहकांवर दरवाढीचा कोणताही भार लादलेला नाही. अर्धा लिटर पाकिटात 550 मि. लि. आणि एक लिटर पाकिटात 1,050 मि. लि. दूध मिळणार आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा दूध उत्पादन 15 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे शेतकरी आणणारे अतिरिक्त दूध संकलन केंद्रांकडून नाकारले जाऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
– सिद्धरामय्या, मुख्यमंत्री
Home महत्वाची बातमी नंदिनी दूध दरात 2 रुपये वाढ
नंदिनी दूध दरात 2 रुपये वाढ
मोबदल्यात मिळणार 50 मि. लि. अतिरिक्त दूध : सुधारित दर आजपासून लागू : केएमएफचा निर्णय प्रतिनिधी/ बेंगळूर पेट्रोल-डिझेल दरवाढीपाठोपाठ आणि दूध दरातही वाढ झाली आहे. कर्नाटक दूध महामंडळाने (केएमएफ) दूध दरात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ केली आहे. ही दरवाढ बुधवार 26 जूनपासूनच लागू केली जात आहे. दूध दरवाढीविषयी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना केएमएफचे अध्यक्ष […]