धुक्याचे साम्राज्य… अन् थंडीचा कडाका!

उत्तर भारतात रात्रीच्या तापमानात मोठी घट : बहुतांश भागात बर्फाची चादर, दक्षिणेत पावसाचाही अंदाज वृत्तसंस्था/ नवी दिल्ली देशाच्या बहुतांश भागात कडाक्मयाची थंडी पडत आहे. रविवारी उत्तर आणि मध्य भारतातील राज्यांमध्ये किमान तापमान 6 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले गेले. याचदरम्यान अनेक राज्यांमध्ये दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. येत्या दोन-तीन दिवसात थंडीचा हा प्रभाव […]

धुक्याचे साम्राज्य… अन् थंडीचा कडाका!

उत्तर भारतात रात्रीच्या तापमानात मोठी घट : बहुतांश भागात बर्फाची चादर, दक्षिणेत पावसाचाही अंदाज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाच्या बहुतांश भागात कडाक्मयाची थंडी पडत आहे. रविवारी उत्तर आणि मध्य भारतातील राज्यांमध्ये किमान तापमान 6 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले गेले. याचदरम्यान अनेक राज्यांमध्ये दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. येत्या दोन-तीन दिवसात थंडीचा हा प्रभाव कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
सध्या ख्रिसमस आणि वर्षअखेरची धूम सुरू असल्यामुळे बऱ्याच भागात सुट्टीचा हंगाम सुरू आहे. बरेच लोक पर्यटनासाठी बाहेर पडले असून ते बदलत्या वातावरणाचा आनंद लुटत आहे. उत्तर भारतात अनेक लोक पर्यटनासाठी घराबाहेर पडल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. तापमान शून्याखाली पोहोचलेल्या भागात हिमवर्षाव झाल्याचेही चित्र दिसून येत होते. दुसरीकडे, तामिळनाडूच्या निलगिरीमध्ये रविवारी तापमान शून्य अंश सेल्सिअसवर पोहोचल्यामुळे रस्त्यावर आणि वाहनांवर बर्फ साचला. पुढील 5 दिवस तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटकात हलक्मया पावसाची शक्मयता हवामान खात्याने वर्तवली आहे.
जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशात एक-दोन दिवस हलका रिमझिम पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्मयता आहे. जम्मू-काश्मीरच्या गुलमर्गमध्ये शनिवारी बर्फवृष्टी झाली. यादरम्यान येथील तापमान -1.5 अंश नोंदवले गेले. रविवारी मध्यप्रदेशातील अनेक शहरांमध्ये दाट धुके होते. थंड वाऱ्यांमुळे सूर्यप्रकाशाचा प्रभावही कमी झाला होता. तथापि, सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, रात्री आणि दिवसाचे तापमान 2 अंशांवरून 8 अंशांपर्यंत वाढले आहे. 26 डिसेंबरपासून राज्यात थंडी वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले.
राजस्थानमध्येही तापमानात वाढ झाली आहे. पश्चिम आणि उत्तर राजस्थानचे जिल्हे धुक्मयाने झाकलेले दिसत होते. जयपूर, हनुमानगड, श्रीगंगानगर, जोधपूर, बिकानेर आणि सीकर यांसारख्या भागात 200 ते 400 मीटर दृश्यता होती. धुक्यामुळे रस्ते अपघाताच्या घटनाही घडत आहेत. दिल्ली-एनसीआरमध्येही सकाळी दाट धुके होते. मात्र, दिवसभर आकाश निरभ्र होते. धुक्याचा परिणाम रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा आणि मिझोराममध्ये गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका पाऊसही पडू शकतो. पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीममध्ये थंडीसोबत दाट धुके पसरले होते. पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि चंदीगडमध्ये धुक्याचा प्रभाव सर्वाधिक दिसून आला.  भोपाळ, ग्वाल्हेर आणि इंदूरमध्ये दृश्यमानता खूपच कमी राहिली. येत्या 26 डिसेंबरपासून थंडीचा प्रभाव पुन्हा वाढणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. छत्तीसगडमधील अनेक जिल्ह्यांमध्येही रविवारी सकाळी दाट धुके होते. महासमुंदच्या लफीनखुर्दमध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत 5 फुटांपर्यंत दृश्यमानता होती. येत्या दोन दिवसात येथील किमान तापमानात किंचित घट होईल, असे हवामान विभागाने जाहीर केले आहे.