दीपेंद्र सिंगचे एका षटकात सहा षटकार

वृत्तसंस्था/ अल अमिरात (कतार) सध्या येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या एसीसी प्रिमियर चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत नेपाळचा फलंदाज दीपेंद्र सिंग एरीने एका षटकात 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला. एका षटकात 6 षटकार नोंदवणारा दीपेंद्र सिंग हा तिसरा फलंदाज ठरला आहे. नेपाळ आणि यजमान कतार यांच्यातील या सामन्यात 24 वर्षीय दीपेंद्र सिंगने 21 चेंडूत 7 षटकार आणि […]

दीपेंद्र सिंगचे एका षटकात सहा षटकार

वृत्तसंस्था/ अल अमिरात (कतार)
सध्या येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या एसीसी प्रिमियर चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत नेपाळचा फलंदाज दीपेंद्र सिंग एरीने एका षटकात 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला. एका षटकात 6 षटकार नोंदवणारा दीपेंद्र सिंग हा तिसरा फलंदाज ठरला आहे.
नेपाळ आणि यजमान कतार यांच्यातील या सामन्यात 24 वर्षीय दीपेंद्र सिंगने 21 चेंडूत 7 षटकार आणि 3 चौकारासह नाबाद 64 धावांची खेळी केली. नेपाळ संघातील असिफ शेखने 52 धावा झोडपल्या. नेपाळने 20 षटकात 7 बाद 210 धावा जमवल्या. क्रिकेटमध्ये एका षटकात 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम आतापर्यंत भारताच्या युवराज सिंगने तसेच विंडीजच्या किरॉन पोलार्डने केला आहे. युवराज सिंगने 2007 च्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर सलग सहा षटकार खेचले होते तर पोलार्डने 2021 साली झालेल्या सामन्यात लंकेच्या अकिला धनंजयच्या षटकात 6 षटकार मारले होते.