तिसऱ्या अंतराळ प्रवासासाठी सुनीता विल्यम्स सज्ज
6 मे रोजी बोईंगच्या पॅप्सूलमधून झेप घेणार
► वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स 6 मे रोजी तिसऱ्या अंतराळ प्रवासाला निघणार आहेत. बोईंगच्या स्टारलायनर पॅलिप्सो मोहीमेद्वारे सुनीता विल्यम्स आणखी एकदा अंतराळ झेप घेणार असल्याची माहिती अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने दिली. या मोहिमेसाठी बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स या दोन ज्येष्ठ शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली आहे. बोईंगचे स्टारलायनर अंतराळयान 6 मे रोजी रात्री 10:34 वाजता अलायन्स अॅटलस व्ही रॉकेटवरून प्रक्षेपित केले जाईल. बोईंग स्टारलायनरची ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर अंतराळ पर्यटनासाठी नवीन दरवाजे उघडतील.
अमेरिका स्पेस एजन्सी लवकरच अंतराळयानाबद्दल संपूर्ण माहिती सामायिक करेल. फ्लोरिडामधील केप पॅनवेरल स्पेस फोर्स स्टेशनच्या स्पेस लॉन्च कॉम्प्लेक्स-41 वरून हे यान प्रक्षेपित केले जाईल. दोन्ही प्रवासी दोन आठवडे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) राहतील. या मोहिमेसाठी नासाची मदत घेण्यात आली असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. यापूर्वी हे अंतराळ यान जुलै 2022 मध्ये निघणार होते, परंतु कोरोना महामारीमुळे ते एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आले होते. सुनीता विल्यम्स सध्या बोईंगच्या स्टारलायनर स्पेसक्राफ्टवर क्रू फ्लाईट टेस्ट मिशन पायलट म्हणून प्रशिक्षण घेत आहे.
उपकरण, वस्तू नेण्याची सुविधा
स्पेस शटल आणि बोईंग स्टारलायनर खूप वेगळे आहेत. अंतराळयान दीर्घकाळ कक्षेत राहू शकते, तर बोईंग स्टारलायनरला कक्षेत कमी वेळ आहे. स्पेसक्राफ्टमध्ये जास्त सामान वाहून जात नाही, परंतु बोईंग स्टारलायनर अंतराळात उपकरणे, सामान दुसऱ्या ग्रहावर नेऊ शकते. या मोहीमेत रॉकेटसह पॅप्सूल अंतराळात जाईल. अंतराळ कक्षेत जाऊन ते इतर ग्रहांवर सहज उतरवता येईल आणि वस्तू पोहोचवता येतील, यावर संशोधन केले जाणार आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास नासासाठी ‘टॅक्सी सेवे’सारखा सोपा प्रवास होईल.
सुनीता विल्यम्सचा अवकाश प्रवास
सुनीता विल्यम्स याआधी दोनदा अंतराळ प्रवासाला गेल्या आहेत. जून 1998 मध्ये सुनीता विल्यम्सची अमेरिकेची अंतराळ संस्था नासामध्ये निवड झाली होती. 9 डिसेंबर 2006 रोजी सुनीता विल्यम्स पहिल्यांदा अंतराळात गेल्या होत्या. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवण्यात आलेले 14 वे शटल डिस्कव्हरीसह त्याचे प्रक्षेपण केल्यानंतर 2012 मध्ये त्यांचा दुसरा अवकाश प्रवास सुरू झाला. त्यानंतर त्याने कझाकस्तानमधून सोयुझ टीएमए-05एम या रशियन रॉकेटवरून उ•ाण केले. सध्या, तिसऱ्या मोहीमेसाठी सुनीता विल्यम्स बोईंगच्या स्टारलायनर स्पेसक्राफ्टवर क्रू फ्लाईट टेस्ट मिशन पायलट म्हणून प्रशिक्षण घेत आहेत.
Home महत्वाची बातमी तिसऱ्या अंतराळ प्रवासासाठी सुनीता विल्यम्स सज्ज
तिसऱ्या अंतराळ प्रवासासाठी सुनीता विल्यम्स सज्ज
6 मे रोजी बोईंगच्या पॅप्सूलमधून झेप घेणार ► वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स 6 मे रोजी तिसऱ्या अंतराळ प्रवासाला निघणार आहेत. बोईंगच्या स्टारलायनर पॅलिप्सो मोहीमेद्वारे सुनीता विल्यम्स आणखी एकदा अंतराळ झेप घेणार असल्याची माहिती अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने दिली. या मोहिमेसाठी बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स या दोन ज्येष्ठ शास्त्रज्ञांची निवड करण्यात […]