तामिळनाडू, केरळ हॉकी संघ विजयी
वृत्तसंस्था/कोलम (केरळ)
2024 सालातील हॉकी इंडियाच्या दुसऱ्या उपकनिष्ट पुरूष आणि महिलांच्या दक्षिण विभागीय हॉकी चॅम्पियनशीप स्पर्धेत मंगळवारी तिसऱ्या दिवशी तामिळनाडू आणि केरळ यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदविले. त्याच प्रमाणे महिलांच्या विभागत आंध्रप्रदेशने आपला विजय नोंदविला.
पुरूषांच्या विभागातील मंगळवारचा आंधप्रदेश आणि कर्नाटक यांच्यातील हिला सामना 3-3 असा बरोबरीत राहिला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात तामिळनाडूने तेलंगणाचा 8-0 असा एकतर्फी पराभ्व केला. तामिळनाडूचा कर्णधार जोव्हेन मिजेने तीन गोलासह हॅटट्रीक साधली. कोविस्काने 2 गोल केले. सुबिका, गोपिका आणि हरिता यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. महिलांच्या अन्य एका सामन्यात आंध्रप्रदेशने कर्नाटकावर 3-0 अशी मात केली. या सामन्यात आंध्रप्रदेशतर्फे बेगम पठाणने 2 गोल तर लक्ष्मीने 1 गोल केला. महिलांच्या विभागातील मंगळवारचा हा शेवटचा सामना होता. महिलांच्या विभागातील मंगळवारच्या सामन्यात केरळने पुडुचेरीचा 11-0 असा एकतर्फी पराभव केला.
पुरूषांच्या विभागातील पहिल्या सामन्यात तामिळनाडूने तेलंगणाचा 11-1 असा पराभव केला. तामिळनाडूतर्फे रणजीतने हॅटट्रीकसह 4 गोल तर गौतमने 3 गोल, नितीशन 2 गोल केले. आंध्रप्रदेशने कर्नाटकाला 3-3 असे बरोबरीत रोखले. पुरूषांच्या विभागातील शेवटच्या सामन्यात केरळने पुडुचेरीवर 7-0 अशी मात केली.
Home महत्वाची बातमी तामिळनाडू, केरळ हॉकी संघ विजयी
तामिळनाडू, केरळ हॉकी संघ विजयी
वृत्तसंस्था/कोलम (केरळ) 2024 सालातील हॉकी इंडियाच्या दुसऱ्या उपकनिष्ट पुरूष आणि महिलांच्या दक्षिण विभागीय हॉकी चॅम्पियनशीप स्पर्धेत मंगळवारी तिसऱ्या दिवशी तामिळनाडू आणि केरळ यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदविले. त्याच प्रमाणे महिलांच्या विभागत आंध्रप्रदेशने आपला विजय नोंदविला. पुरूषांच्या विभागातील मंगळवारचा आंधप्रदेश आणि कर्नाटक यांच्यातील हिला सामना 3-3 असा बरोबरीत राहिला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात तामिळनाडूने तेलंगणाचा 8-0 असा एकतर्फी […]