टीम इंडियाचे झिम्बाब्वेत जल्लोषी स्वागत
वृत्तसंस्था/ ग्रोस
टी-20 विश्वचषकची ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया झिम्बाब्वेला पोहोचली आहे. हरारे येथे दाखल झाल्यानंतर भारतीय संघाचे झिम्बाब्वे क्रिकेटने खास स्वागत केले. राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्याने व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ टी-20 मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वेत दाखल झाला आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना 6 जुलै रोजी होणार आहे. दुसरा सामना 7 जुलैला, तिसरा सामना 10 जुलैला, चौथा सामना 13 जुलैला आणि या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना 14 जुलैला खेळवला जाईल. सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 4.30 वाजता सुरू होतील. सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लब येथे होणार आहेत. दरम्यान, आयपीएल 2024 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंचा झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. यात ऋतुराज गायकवाड, रियान पराग, अभिषेक शर्मा, तुषार देशपांडे, खलील अहमद, ध्रुव जुरेल, आवेश खान, मुकेश कुमार आणि रवी बिश्नोई यांचा समावेश आहे. याशिवाय, बीसीसीआयने पहिल्या दोन सामन्यासाठी साई सुदर्शन, जितेश शर्मा व हर्षित राणा यांना संधी दिली आहे. शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल व संजू सॅमसन हे तिघे वर्ल्डकप संघाचे सदस्य असल्यामुळे पहिल्या दोन सामन्यात सहभागी होऊ शकणार नाहीत. उर्वरित तीन सामन्यात मात्र हे तिघे सहभागी होणार आहेत.
Home महत्वाची बातमी टीम इंडियाचे झिम्बाब्वेत जल्लोषी स्वागत
टीम इंडियाचे झिम्बाब्वेत जल्लोषी स्वागत
वृत्तसंस्था/ ग्रोस टी-20 विश्वचषकची ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया झिम्बाब्वेला पोहोचली आहे. हरारे येथे दाखल झाल्यानंतर भारतीय संघाचे झिम्बाब्वे क्रिकेटने खास स्वागत केले. राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्याने व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ टी-20 मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वेत दाखल झाला आहे. भारत आणि झिम्बाब्वे […]