जोकोविच तिसऱ्या फेरीत

वृत्तसंस्था/ माँटे कार्लो येथे सुरू झालेल्या माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत विद्यमान जागतिक अग्रमानांकित सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने विजयी सुरुवात करताना रोमन सफिउल्लिनचा पराभव केला. तिसऱ्या मानांकित स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. पहिल्या फेरीत बाय मिळालेल्या जोकोविचने रशियाच्या बिगरमानांकित सफिउल्लिनवर पूर्ण वर्चस्व राखत 6-1, 6-2 असा त्याचा धुव्वा उडवित तिसरी फेरी गाठली. […]

जोकोविच तिसऱ्या फेरीत

वृत्तसंस्था/ माँटे कार्लो
येथे सुरू झालेल्या माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत विद्यमान जागतिक अग्रमानांकित सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने विजयी सुरुवात करताना रोमन सफिउल्लिनचा पराभव केला. तिसऱ्या मानांकित स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे.
पहिल्या फेरीत बाय मिळालेल्या जोकोविचने रशियाच्या बिगरमानांकित सफिउल्लिनवर पूर्ण वर्चस्व राखत 6-1, 6-2 असा त्याचा धुव्वा उडवित तिसरी फेरी गाठली. 36 वर्षीय जोकोविच हा एटीपी मानांकनात अग्रस्थान मिळविणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू बनला आहे. अन्य सामन्यात अमेरिकेच्या सेबॅस्टियन कोर्दाने अलेजान्द्राs डेव्हिडोविच फोकिनाचा 6-1, 6-2 असा फडशा पाडत दुसरी फेरी गाठली. पावसाचा व्यत्यय आल्याने अडीच तास खेळ थांबवावा लागला होता. जागतिक अकराव्या मानांकित अॅलेक्स डी मिनॉरने स्विसच्या स्टॅन वावरिंकावर 6-3, 6-0 अशी सहज मात केली. पुढील फेरीत त्याची लढत हॉलंडच्या टॅलन ग्रीकस्पूरशी होईल.
स्पेनच्या रॉबर्टो बॉटिस्टा अॅगटने फॅकन्डो डायझ अॅकॉस्टाचा 6-2, 6-4, चीनच्या झँग झिझेनने अमेरिकेच्या मार्कोस गिरॉनचा तीन सेट्समध्ये, ह्युबर्ट हुरकाझने ब्रिटनच्या जॅक ड्रेपरचा अडीच तासाच्या खेळात 6-4, 3-6, 7-6 (7-2) असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. गेल्या आठवड्यात माराकेश ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या इटलीच्या मॅटेव बेरेटिनीचे येथील आव्हान मात्र पहिल्याच फेरीत समाप्त झाले. त्याला मिओमिर केसमानोविचने 6-3, 6-1 असे हरविले.