जैश-ए-मोहम्मदचा हस्तक पुलवामा येथून अटकेत
मोठ्या प्रमाणात दारूगोळाही जप्त
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. पुलवामाच्या नैना बटापोरामध्ये सुरक्षा दल शोधमोहीम राबवत असताना या दहशतवाद्याला पकडण्यात आले. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव रोहेल अब्दुल्ला असे असून तो शोपियानमधील नुली पोशवारी येथील रहिवासी आहे. रोहेल 8 डिसेंबरपासून घरातून बेपत्ता होता. त्याच्या ताब्यातून 1 एके 56 रायफल, 2 एके मॅगझिन आणि 60 राउंड, पाच चिनी ग्रेनेड, एक पिस्तूल आणि 26 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
Home महत्वाची बातमी जैश-ए-मोहम्मदचा हस्तक पुलवामा येथून अटकेत
जैश-ए-मोहम्मदचा हस्तक पुलवामा येथून अटकेत
मोठ्या प्रमाणात दारूगोळाही जप्त वृत्तसंस्था/ श्रीनगर जम्मू काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. पुलवामाच्या नैना बटापोरामध्ये सुरक्षा दल शोधमोहीम राबवत असताना या दहशतवाद्याला पकडण्यात आले. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव रोहेल अब्दुल्ला असे असून तो शोपियानमधील नुली पोशवारी येथील रहिवासी आहे. रोहेल 8 डिसेंबरपासून घरातून बेपत्ता होता. […]