इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये 48 ठार
वृत्तसंस्था/ गाझा
दक्षिण आणि मध्य गाझामध्ये रात्रभर झालेल्या इस्रायली हल्ल्यांमध्ये किमान 48 लोक ठार झाल्याचे शुक्रवारी सांगण्यात आले. मृतांमध्ये निम्म्याहून अधिक महिला आणि मुलांचा समावेश आहे. वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर युरोपियन परराष्ट्र मंत्री आणि यूएन एजन्सींनी पुन्हा एकदा युद्धबंदीची मागणी केली. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम कराराबाबत नवीन प्रयत्न सुरू आहेत. इस्रायलव्याप्त पश्चिम भागातही तणाव वाढला असून गुऊवारी येथे तीन पॅलेस्टिनी बंदूकधाऱ्यांनी एका महामार्गावरील चेकपॉईंटमधून जाणाऱ्या वाहनांवर गोळीबार केला. या हल्ल्यात एक व्यक्ती ठार आणि पाच जण जखमी झाले, असे इस्रायली पोलिसांनी सांगितले.
Home महत्वाची बातमी इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये 48 ठार
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये 48 ठार
वृत्तसंस्था/ गाझा दक्षिण आणि मध्य गाझामध्ये रात्रभर झालेल्या इस्रायली हल्ल्यांमध्ये किमान 48 लोक ठार झाल्याचे शुक्रवारी सांगण्यात आले. मृतांमध्ये निम्म्याहून अधिक महिला आणि मुलांचा समावेश आहे. वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर युरोपियन परराष्ट्र मंत्री आणि यूएन एजन्सींनी पुन्हा एकदा युद्धबंदीची मागणी केली. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम कराराबाबत नवीन प्रयत्न सुरू आहेत. इस्रायलव्याप्त पश्चिम भागातही तणाव वाढला […]