इंग्लंडची सारा ग्लेन अव्वल स्थानाच्या शर्यतीत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली इंग्लंड महिला क्रिकेट संघातील फिरकी गोलंदाज सारा ग्लेन आयसीसीच्या महिलांच्या टी-20 गोलंदाजांच्या ताज्या मानांकनात अव्वल स्थान मिळविण्याच्या शर्यतीमध्ये आघाडीवर आहे. सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या टी-20 मालिकेत सारा ग्लेनने चार सामन्यांतून 8 गडी बाद केले आहेत. या कामगिरीमुळे तिने आयसीसीच्या महिलांच्या टी-20 गोलंदाजांच्या मानांकन यादीत 768 रेटींग गुणासह दुसऱ्या स्थानावर […]

इंग्लंडची सारा ग्लेन अव्वल स्थानाच्या शर्यतीत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंग्लंड महिला क्रिकेट संघातील फिरकी गोलंदाज सारा ग्लेन आयसीसीच्या महिलांच्या टी-20 गोलंदाजांच्या ताज्या मानांकनात अव्वल स्थान मिळविण्याच्या शर्यतीमध्ये आघाडीवर आहे.
सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या टी-20 मालिकेत सारा ग्लेनने चार सामन्यांतून 8 गडी बाद केले आहेत. या कामगिरीमुळे तिने आयसीसीच्या महिलांच्या टी-20 गोलंदाजांच्या मानांकन यादीत 768 रेटींग गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे. आता आगामी ताज्या मानांकन यादीत ती अव्वलस्थान पटकावेल, असा अंदाज आहे. महिलांच्या टी-20 गोलंदाजांच्या मानांकन यादीत आघाडीचे स्थान मिळविण्याकरिता प्रामुख्याने सारा ग्लेन आणि इंग्लंडची फिरकी गोलंदाज सोफी इक्लेस्टोन यांच्यात चढाओढ सुरू झाली आहे. न्यूझीलंड विरूध्दच्या पहिल्या चार सामन्यात इक्लेस्टोनने 8 गडी बाद केले आहेत. या मानांकन यादीत भारताची फिरकी गोलंदाज दिप्ती शर्मा तिसऱ्या स्थानावर राहिल. द. आफ्रिका विरूध्दच्या मालिकेत दिप्ती शर्माची कामगिरी दर्जेदार झाली होती. राधा यादव 15 व्या तर पूजा वस्त्रकर 23 व्या स्थानावर आहेत. टी-20 महिलांच्या फलंदाजांच्या मानांकनात ऑस्ट्रेलियाचे बेथ मुनी आणि मॅकग्रा हे पहिल्या दोन स्थानावर आहेत. भारताची हरमनप्रित कौर 12 व्या तर शेफाली वर्मा 15 व्या स्थानावर आहेत. टी-20 अष्टपैलुंच्या मानांकनात विंडीजची हिली मेथ्युज पहिल्या स्थानावर असून दिप्ती शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे.