‘आयकॉन श्री’ शरीर सौष्ठवचा मानकरी हाफीज अत्तार!

जिल्हा अॅम्येचुअर बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्यावतीने स्पर्धेचे आयोजन; 120 स्पर्धक सहभागी कोल्हापूर प्रतिनिधी कोल्हापूर जिल्हा अॅम्येचुअर बॉडीबिल्डर्स असोसिएशन, कोल्हापूर यांच्यावतीने ‘आयकॉन श्री’ जिल्हा मर्यादित, व टॉप टेन या स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी जिल्हा व स्थानिक पातळीवरील 120 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. हाफीज अत्तार हा यास्पर्धेचा मानकरी ठरला. असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. रविंद्र मोरे व सरपंच […]

‘आयकॉन श्री’ शरीर सौष्ठवचा मानकरी हाफीज अत्तार!

जिल्हा अॅम्येचुअर बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्यावतीने स्पर्धेचे आयोजन; 120 स्पर्धक सहभागी

कोल्हापूर प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा अॅम्येचुअर बॉडीबिल्डर्स असोसिएशन, कोल्हापूर यांच्यावतीने ‘आयकॉन श्री’ जिल्हा मर्यादित, व टॉप टेन या स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी जिल्हा व स्थानिक पातळीवरील 120 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. हाफीज अत्तार हा यास्पर्धेचा मानकरी ठरला. असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. रविंद्र मोरे व सरपंच राहूल शेटे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असा
आयकॉन श्री जिम मर्यादित
गट क्र.1 – आदर्श केकरे, अनिल हणमंत, सार्थक पाटील, यशोदिप देवकर, प्रथमेश पाटील. गट क्र.2 – अशोक वाघमारे, अदित्य मोरे, राजाराम महापुरे, रोहीत बेडके निखिल शिंदे. गट क्र.3 – धनाजी पाटील, धीरज गुरव, राज जाधव, प्रतिक दिवे, आशिष कांबळे. टायटल – धनाजी पाटील, बेस्ट पोजर, आदर्श कोकरे, मोस्ट इंप्रुव्हड, अशोक वाघमारे
आयकॉन श्री जिल्हा मर्यादित (नवोदित)
गट क्र.1- ओंकार नाळे, संकेत सदाघोळ, आदर्श केकरे, आयुष विभुते, केतन कापडे. गट क्र 2 – प्रशांत केंबळे, धीरज साळोखे, शिवम चौगले, अभिषेक रजपुत, हर्ष कातरड. गट क्र.3- हाफीज आत्तार, उत्कर्ष मळगे, यश अपराध, आदित्य भुईगडे, ऋषीकेश पाटील. टायटल – हाफीज आत्तार, बेस्ट पोजर ओंकार नाळे, मोस्ट इंप्रुव्हड प्रशांत केंबळे.
टॉप टेन स्पर्धेचे विजेते
हाफीज आत्तार, ऋषीकेश रणदिवे, प्रशांत केंबळे, उत्कर्ष माळगे, ओंकार नाळे, सागर संकपाळ, यश अपराध, शिवम चौगले, रुकेश पाटील, आदित्य भुईंगडे.
स्पर्धेचे आयोजन पापालाल पठाण (सर), अरविंद भानुसे (स्टेटरेफ्री), सरदार आवळे (उद्योगपती) यांनी केले. या स्पर्धेसाठी राज्य पंच नारायण माजगांवकर, भारतश्री राजु कवाळे, गणेश सकट, सिकंदर सोनुले, सचिन आवळे, कमलाकर निकम, महादेव कांबळे, संदीप घाटगे, संजय हेगडे, हेमंत कवाळे यांनी काम पाहीले. यावेळी राजेश शांतगोंडा पाटील, बरकत अंबी, अमीत पाटील, शिरीष शिरगावे, प्रविण भानुसे, जहांगीर मुल्लाणी, डॉ. गुंडा सावंत, अॅड. प्रशांत पाटील, कुमार चोरमुळे, महेश जाधव, हाजी जमादार, बकस कुरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. विजेत्या स्पर्धकांची निवड 27 जानेवारी चिपळुन येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.