अनोख्या छंदातून सुचला नवा व्यवसाय

घराबाहेर झोपण्याचा होता छंद जगात वेगवेगळ्या प्रकारचे लोक असून त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. अनेक लोक शहरांमधील गर्दीपासून दूर पळू इच्छितात. अशा स्थितीत शांतपणे जगण्याची संधी मिळाली आणि पैसेही कमाविता आले तर ते कुणाला नको असेल. पीटर नावाच्या एका इसमाने घराबाहेर झोपण्याच्या छंदातून सुचलेली एक कल्पना अंमलात आणली आणि आता हिट ठरली आहे. पीटर […]

अनोख्या छंदातून सुचला नवा व्यवसाय

घराबाहेर झोपण्याचा होता छंद
जगात वेगवेगळ्या प्रकारचे लोक असून त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. अनेक लोक शहरांमधील गर्दीपासून दूर पळू इच्छितात. अशा स्थितीत शांतपणे जगण्याची संधी मिळाली आणि पैसेही कमाविता आले तर ते कुणाला नको असेल.
पीटर नावाच्या एका इसमाने घराबाहेर झोपण्याच्या छंदातून सुचलेली एक कल्पना अंमलात आणली आणि आता हिट ठरली आहे. पीटर बहुथने स्वत:च्या बालपणीच्या छंदातून अशी बिझनेस आयडिया अंमलात आणली, ज्यामुळे त्याचे नशीबच उजळले आहे.
पीटर बहूथ अमेरिकेच्या जॉर्जिया प्रांतातील अटलांटा येथे राहतो. बालपणी मी आजोबांकडे गेल्यावर बाहेर झोपणे पसंत करायचो. अशा स्थितीत अटलांटा येथे घर घेतल्यावर मी परिसरात असलेल्या झालेल्या झाडांना पाहून ट्री हाउस तयार करण्याचा विचार केला. यानंतर 8 फूटांचे छोटेसे ट्री हाउस तयार केले. मग हळूहळू त्याला 3 बेडरुम असलेले ट्री हाउसचे स्वरुप दिले. परंतु मला कधीच हे ट्री हाउस खरेदी करेल किंवा त्यात भाड्याने रहायला येईल असे वाटले नव्हते असे पीटर सांगतो.
एका दिवसाला 31 हजार
24 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या ट्री हाउसमुळे पीटरला आता मोठी कमाई होत आहे. यामुळे त्याने स्वत:ची नोकरी सोडली आहे. तो आता समाधानाने जंगलानजीकच्या या ट्री हाउसनजीक राहतो. लोकांकरता त्याने याचे भाडे 31 हजार रुपये प्रत्येक रात्रीसाठी ठेवले आहे. तसेच लोक येथे आनंदाने येत असतात. घरातील सुंदरता आणि जुने फर्निचर पाहण्याजोगे आहे. यात एअर कंडिशनरची गरज भासत नाही. या ट्री हाउसमुळे त्याला लाखोंची कमाई होत असून लोक याला 5 स्टार रिह्यू देखील देत आहेत.