नवी मुंबई: फ्लेमिंगोच्या संरक्षणासाठी एलईडी दिवे बदलणार
नवी मुंबईतील फ्लेमिंगोच्या सुरक्षिततेसाठी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) पांढऱ्या एलईडी दिव्याऐवजी फिकट पिवळे दिवे लावण्याचा विचार करत आहे. पांढऱ्या एलएडी दिव्यांचा पक्ष्यांना त्रास होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक फ्लेमिंगो जखमी होतात आणि चकाकणाऱ्या भागांजवळील वस्तूंवर आदळल्यानंतर त्यांचा मृत्यूही होतो. अधिका-यांनी पुष्टी केली की एलएडी दिवे पक्ष्यांना गोंधळात टाकत होते. याआधी पक्ष्यांच्या सुरक्षेसाठी सिडकोने फेब्रुवारी महिन्यात नेरुळ जेट्टीवरील मोठा फलक हटवला होता. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) या वन्यजीव संरक्षण संस्थेने पुष्टी केली की. एलएडी दिवे त्यांच्या मार्गातच असल्याने त्यांचा गोंधळ होत आहे. सिडको आता 96 नवीन पोल बसवण्याचा आणि सध्याचे एलईडी दिवे बदलण्याचे नियोजन करत आहे. या प्रकल्पासाठी 28.97 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सिडकोला सादर केलेल्या एका अभियंत्याच्या अहवालानुसार पक्ष्यांना त्रास होऊ नये म्हणून नवीन दिवे आणि खांब पुन्हा बसवण्यात येणार आहेत. जानेवारी ते एप्रिल दरम्यान 17 फ्लेमिंगो दिव्यांमुळे आंधळे झाले आणि मरण पावले. यातील काही पक्षी जलवाहतुकीच्या टर्मिनलजवळील 20 फुटांच्या फलकावर आदळले. एप्रिलमध्ये सात फ्लेमिंगोच्या मृत्यूनंतर, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) ने तपासासाठी पाऊल उचलले. त्यातून ही बाब उघड झाली. हेही वाचा22 ऑगस्ट ठरला मुंबईतील 1969 नंतरचा सर्वात उष्ण दिवस
बेकायदेशीरपणे वृक्षतोड करणाऱ्यांना आता अधिक दंड भरावा लागणार
Home महत्वाची बातमी नवी मुंबई: फ्लेमिंगोच्या संरक्षणासाठी एलईडी दिवे बदलणार
नवी मुंबई: फ्लेमिंगोच्या संरक्षणासाठी एलईडी दिवे बदलणार
नवी मुंबईतील फ्लेमिंगोच्या सुरक्षिततेसाठी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) पांढऱ्या एलईडी दिव्याऐवजी फिकट पिवळे दिवे लावण्याचा विचार करत आहे. पांढऱ्या एलएडी दिव्यांचा पक्ष्यांना त्रास होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
अनेक फ्लेमिंगो जखमी होतात आणि चकाकणाऱ्या भागांजवळील वस्तूंवर आदळल्यानंतर त्यांचा मृत्यूही होतो. अधिका-यांनी पुष्टी केली की एलएडी दिवे पक्ष्यांना गोंधळात टाकत होते.
याआधी पक्ष्यांच्या सुरक्षेसाठी सिडकोने फेब्रुवारी महिन्यात नेरुळ जेट्टीवरील मोठा फलक हटवला होता. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) या वन्यजीव संरक्षण संस्थेने पुष्टी केली की. एलएडी दिवे त्यांच्या मार्गातच असल्याने त्यांचा गोंधळ होत आहे.
सिडको आता 96 नवीन पोल बसवण्याचा आणि सध्याचे एलईडी दिवे बदलण्याचे नियोजन करत आहे. या प्रकल्पासाठी 28.97 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सिडकोला सादर केलेल्या एका अभियंत्याच्या अहवालानुसार पक्ष्यांना त्रास होऊ नये म्हणून नवीन दिवे आणि खांब पुन्हा बसवण्यात येणार आहेत.
जानेवारी ते एप्रिल दरम्यान 17 फ्लेमिंगो दिव्यांमुळे आंधळे झाले आणि मरण पावले. यातील काही पक्षी जलवाहतुकीच्या टर्मिनलजवळील 20 फुटांच्या फलकावर आदळले. एप्रिलमध्ये सात फ्लेमिंगोच्या मृत्यूनंतर, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) ने तपासासाठी पाऊल उचलले. त्यातून ही बाब उघड झाली. हेही वाचा
22 ऑगस्ट ठरला मुंबईतील 1969 नंतरचा सर्वात उष्ण दिवसबेकायदेशीरपणे वृक्षतोड करणाऱ्यांना आता अधिक दंड भरावा लागणार