Different sheds of lipsticks सावळ्या रंगाच्या स्त्रियांना कोणती लिपस्टिक शोभून दिसतील…
Which lipsticks suit dark skinned women काही मुलींना वाटत आपला गोरा रंग का नाही, जर आपण दिसायला गोरी असते तर किती छान झाल असत. असे काही विचार मुली करतात. मात्र ते मुळातच विसरतात की, सावळा रंगातही सौंदर्य लपलेले असते. नाकीडोळी सुंदर असलेल्या सावळ्या स्त्रीचे सौंदर्य गोऱ्या रंगावरही मात करते. सावळ्या रंगाच्या स्त्रियांचे डोळे व ओठ हे दोन अवयव सौंदर्यात भर घालण्यात महत्वाची भूमिका बजावतात. सुंदरसे काजळ लावल्याने डोळे सुंदर दिसतील तर ओठांवर योग्य लिपस्टिक लावून ओठही आकर्षक बनवता येतात. सावळ्या रंगाच्या स्त्रियांनी कोणत्या रंगाच्या लिपस्टिक निवडल्याने त्या आणखीच सुंदर दिसतील…
कॉपर ब्राउन
सावळ्या रंगाच्या महिलांना कॉपर ब्राउन रंगाची लिपस्टिक चांगली दिसते. कोणत्याही वेळी ही लिपस्टिक वापरता येईल. कॉकटेल पार्टीसारख्या कार्यक्रमांमध्येही ही लिपस्टिक त्यांना उठून दिसेल.
लाल रंगाची लिपस्टिक
प्रत्येकाला खुलून दिसणारा हा रंग आहे. सावळ्या रंगाच्या महिलांनाही लाल रंगाची लिपस्टिक चांगली दिसेल. लिपस्टिक लावण्यापूर्वी लायनरने ओठांचा आकार रेखाटून घ्या, त्यानंतर आतमध्ये लिपस्टिक लावा.
फुशिया
जांभळ्या आणि लाल रंगाचे मिश्रण असलेला हा रंग फक्त उजळ रंगाच्या मुलींनाच सूट होतो, असा समज असेल तर तो काढून टाका. सावळ्या रंगावरही फुशिया रंगाची लिपस्टिक छान दिसते.