Kulgam Encounter कुलगाम-बारामुल्लामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; दोन दहशतवादी ठार
Kulgam Encounter दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील समनु गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुपारी ही चकमक सुरू झाली. यासोबतच सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरले असून दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू आहे.
यासोबतच एलओसीजवळ बारामुल्लाच्या उरी सेक्टरमध्ये चकमक झाली, ज्यामध्ये लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी कुलगामच्या नेहामा गावात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली होती.
#WATCH | Encounter has started at Samno, D.H Pora area of Kulgam district. Police and security forces are on the job: Kashmir Zone Police
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/VI1ml6R3mk
— ANI (@ANI) November 16, 2023
ते म्हणाले की, दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार सुरू केल्याने शोध मोहिमेचे रुपांतर गोळीबारात झाले. अधिका-यांनी सांगितले की अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त मिळालेले नाही आणि अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.