गोवा नागरी सेवेतील 20 अधिकाऱ्यांच्या बदल्या

गोवा नागरी सेवेतील 20 अधिकाऱ्यांच्या बदल्या

पणजी : राज्यातील नागरी सेवेतील वीस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कार्मिक खात्याचे अवर सचिव इशांत सावंत यांनी हा आदेश काढला आहे. कार्मिक खात्याने काढलेल्या आदेशानुसार, फ्रान्सकिना ऑलिव्हेरा यांची (महिला आणि बाल कल्याण खात्याच्या संचालक), प्रशांत शिरोडकर यांची (राजभाषा संचालक), गुऊदास देसाई यांची (राज्य निबंधक आणि नोटरी प्रमुख) तर राजू गावस यांची वीज खात्याच्या (प्रशासन) संचालकपदी बदली करण्यात आली आहे. दीपक देसाई यांची प्रशासकीय सुधारणा विभागाच्या (एआरडी) अतिरिक्त सचिवपदी बदली करण्यात आली आहे. यशिवाय त्यांच्याकडे राज्य एससी, ओबीसी वित्त आणि विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.
केदार नाईक यांची क्रीडा प्राधिकरणाचे (प्रशासन) संचालकपदी, विशाल कुंडईकर यांची दक्षिण गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी-3, पुंडलिक खोर्जुवेकर यांची उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी-1, रोशेल फर्नांडिस यांची व्यावसायिक कर शाखेचे अतिरिक्त आयुक्त, स्नेहल प्रभू यांची व्यावसायिक कर शाखेचे अतिरिक्त आयुक्त, विवेक नाईक यांची व्यावसायिक कर शाखेचे अतिरिक्त आयुक्त, अक्षय पोटेकर यांची दक्षता खात्याचे अतिरिक्त संचालक,नॅथन आरावजो यांची गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे (प्रशासन) संचालक,तृप्ती मणेरकर यांची आरोग्य खात्याच्या संयुक्त संचालकपदी बदली करण्यात आली आहे.प्रवीण हिरे परब यांची उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी-2, उदय प्रभू देसाई यांची दक्षिण गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी-2, नारायण मोरजकर यांची विशेष जमीन संपादन अधिकारी, पराग नगर्सेकर यांची गोवा रियल इस्टेट नियामक प्राधिकरणाचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.
मान्युएल बार्रेटो यांची महिला आणि बाल कल्याण खात्याच्या संयुक्त संचालक, तर वर्षा नाईक यांची दिव्यांग खात्याच्या संचालकपदी बदली करण्यात आली असून, त्यांच्याकडे शिक्षण विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचाही अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. आयशा वायंगणकर यांच्याकडे शिक्षण खात्यातील कर्तव्याव्यतिरिक्त गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक (प्रशासन) पदाचा कार्यभार असेल. उत्तर गोव्याचे अपर जिल्हाधिकारी 3 रोहित कदम यांच्याकडे त्यांच्या स्वत:च्या कर्तव्यांव्यतिरिक्त अभिलेखागार संचालक आणि गोवा मनोरंजन संस्थेच्या ओएसडी या पदाचा कार्यभार असेल. व्यवस्थापकीय संचालक गोवा राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हरीष अडकोणकर हे त्यांच्या स्वत:च्या कर्व्या व्यतिरिक्त सहसचिव (गृहनिर्माण) पदाचा कार्यभार सांभाळतील.