मालाड : इमारतीचा स्लॅब कोसळून 3 कामगारांचा मृत्यू
मालाड येथील इमारतीच्या 20 व्या मजल्यावरील छताचा काही भाग गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.मालाड येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत (SRA) बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू होते. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास 20 व्या मजल्यावरील छताचा काही भाग अचानक कोसळला. बांधकामाच्या ठिकाणी काम करणारे काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकले असावेत, असा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले.या अपघातात जखमी झालेल्या सहा जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून त्यांना जवळच्या एमडब्ल्यू देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील तिघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले असून एकाला ऑर्थोपेडिक विभागात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर झोपडीधारक आक्रमक झाले असून त्यांनी पोलिसांना घेराव घातला. झोपडीधारकांनी विकासक आणि कंत्राटदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी देखील घटनास्थळावर धाव घेऊन नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.यावेळी आमदार अतुल भातखळकर यांनी झोन १२ च्या डीसीपी स्मिता पाटील यांना विकासक आणि कंत्राटदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. आजच एसआरए मुख्याधिकारी कल्याणकर यांना पत्र लिहून तात्काळ काम थांबावणायासाठी आदेश काढण्याची विनंती करणार आहे.हेही वाचा
Home महत्वाची बातमी मालाड : इमारतीचा स्लॅब कोसळून 3 कामगारांचा मृत्यू
मालाड : इमारतीचा स्लॅब कोसळून 3 कामगारांचा मृत्यू
मालाड येथील इमारतीच्या 20 व्या मजल्यावरील छताचा काही भाग गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.
मालाड येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत (SRA) बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू होते. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास 20 व्या मजल्यावरील छताचा काही भाग अचानक कोसळला. बांधकामाच्या ठिकाणी काम करणारे काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकले असावेत, असा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले.
या अपघातात जखमी झालेल्या सहा जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून त्यांना जवळच्या एमडब्ल्यू देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील तिघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले असून एकाला ऑर्थोपेडिक विभागात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर झोपडीधारक आक्रमक झाले असून त्यांनी पोलिसांना घेराव घातला. झोपडीधारकांनी विकासक आणि कंत्राटदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी देखील घटनास्थळावर धाव घेऊन नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
यावेळी आमदार अतुल भातखळकर यांनी झोन १२ च्या डीसीपी स्मिता पाटील यांना विकासक आणि कंत्राटदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. आजच एसआरए मुख्याधिकारी कल्याणकर यांना पत्र लिहून तात्काळ काम थांबावणायासाठी आदेश काढण्याची विनंती करणार आहे.हेही वाचा