भांडुप : खासगी शाळेत तीन विद्यार्थिनींचा विनयभंग
शाळेत ड्रेनेज दुरुस्तीसाठी आलेल्या कर्मचाऱ्याने तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना भांडुप परिसरात घडली आहे. यातील दोन विद्यार्थिनी 10 वर्षांच्या तर एक 12 वर्षांची होती. याप्रकरणी मुलींच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.भांडुप पश्चिम परिसरातील एका खासगी शाळेत बुधवारी ही घटना घडली. शाळेच्या इमारतीतील व्हेंटिलेशन व्यवस्थित नसल्याची तक्रार होती. ते दुरुस्त करण्यासाठी दोन कामगार येथे आले. यातील एका कर्मचाऱ्याने तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केला. घरी परतल्यानंतर मुलींनी ही बाब त्यांच्या पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांनी भांडुप पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी गोपाल गौडा (27) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.हेही वाचाभांडुप : श्वानाला इजा केल्याप्रकरणी शिक्षिकेची शेजाऱ्याविरुद्ध तक्रार
Home महत्वाची बातमी भांडुप : खासगी शाळेत तीन विद्यार्थिनींचा विनयभंग
भांडुप : खासगी शाळेत तीन विद्यार्थिनींचा विनयभंग
शाळेत ड्रेनेज दुरुस्तीसाठी आलेल्या कर्मचाऱ्याने तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना भांडुप परिसरात घडली आहे. यातील दोन विद्यार्थिनी 10 वर्षांच्या तर एक 12 वर्षांची होती. याप्रकरणी मुलींच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
भांडुप पश्चिम परिसरातील एका खासगी शाळेत बुधवारी ही घटना घडली. शाळेच्या इमारतीतील व्हेंटिलेशन व्यवस्थित नसल्याची तक्रार होती. ते दुरुस्त करण्यासाठी दोन कामगार येथे आले. यातील एका कर्मचाऱ्याने तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केला.
घरी परतल्यानंतर मुलींनी ही बाब त्यांच्या पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांनी भांडुप पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी गोपाल गौडा (27) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.हेही वाचा
भांडुप : श्वानाला इजा केल्याप्रकरणी शिक्षिकेची शेजाऱ्याविरुद्ध तक्रार