KGF स्टारच्या वाढदिवसाची तयारी करताना तिघांचा दुर्देवी मृत्यू
कन्नड सुपरस्टार यशचा आज वाढदिवस आहे. नवा पॅन स्टार म्हणून त्याला प्रसिद्धी मिळाली आहे. त्याची कारकिर्दी 2000 पासून सुरु झाली. तो साऊथचा सुपर स्टार आहे. त्याचे असंख्य चाहते आहे. आज त्याच्या वाढदिवसावर लोक शुभेच्छांचा वर्षाव करत असताना एक वाईट बातमी समोर आली आहे. त्याच्या वाढदिवसाची तयारी करत असताना त्याच्या 3 चाहत्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना गदग जिल्ह्यातील लक्ष्मेश्वर तालुक्यातील सुरंगी गावात घडली आहे.
या गावात मध्यरात्री तीन तरुण यशच्या वाढदिवसाच्या एक दिवस पूर्वी कटआऊट लावत असताना विजेचा जोरदार धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहे. हणमंता हरिजन, नवीन गाझी , मुरली नदविदमणी या तिघांचा मृत्यू झाला. तर इतर तिघांना जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
यशने KGF2 मध्ये दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले. आता यश गीतू मोहनदासच्या टॉक्सिक :या फेयरी टेल फॉर ग्रोन अप्स या चित्रपटात दिसणार आहे. तसेच यश नितीश तिवारी यांच्या रामायण चित्रपटात दिसणार असून त्यात रावणाची भुमीका साकारण्याचे म्हटले जात आहे.
Edited by – Priya Dixit