Nagpur : रात्री एकत्र राहिले सकाळी तरुणीने तरुणावर चाकूने हल्ला केला, गुन्हा दाखल
नागपूरच्या घाट रोड वर एका हॉटेल मध्ये खोलीत तरुणीने तरुणावर चाकूने हल्ला केला आणि त्याला जखमी केले. मुलगा कसाबसा आपला जीव वाचवून तिथून पळाला.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाची तरुणीशी एका मित्राच्या मार्फत ओळख झाली नंतर दे दोघे भेटले दिवसभर अमली पदार्थाचे सेवन केले. फिरून झाल्यावर ते एका हॉटेल मध्ये गेले. तिथेच एका खोलीत होते.
सकाळी उठल्यावर तरुणीने तरुणाकडे सिगारेट ओढण्याचा हट्ट केला. नंतर ते दोघे सिगारेट घेण्यासाठी दुकानात गेले तिथे सिगारेट ओढून झाल्यावर ते पुन्हा खोलीत आले आणि अमली पदार्थाचे सेवन करू लागले. त्यांच्या पैशांवरून काही वाद झाला. तरुणीने रागाच्या भरात येऊन आपल्या पर्स मधून चाकू काढून तरुणावर हल्ला केला.
त्यात मुलाने रोखण्याच्या प्रयत्नात तिच्या हातावर चाकूचे घाव झाले. मुलाने कसाबसा आपला जीव वाचवत तिथून पळ काढला. हॉटेलच्या पायऱ्या रक्ताने माखल्या होत्या.
पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळ गाठून दोघांना जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
तरुणीच्या तक्रारीच्या आधारे तरुणाच्या विरोधात पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आणि तरुणाच्या तक्रारीच्या आधारे तरुणीवर जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited by – Priya Dixit